News Flash

निकिता तोमर हत्या प्रकरण: हरियाणा कोर्टाने तौसिफ आणि रेहानला ठरवलं दोषी

२१ वर्षीय निकिताची दिवसाढवळ्या गोळी घालून हत्या करण्यात आली होती

संग्रहित छायाचित्र

निकिता तोमर हत्या प्रकऱणातील मुख्य आरोपी तौसिफ आणि त्याचा सहकारी रेहान यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. २१ वर्षीय निकिता तोमरची गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. १ डिसेंबरला याप्रकरणी खटल्याची सुनावणी सुरु होती. यानंतर तब्बल चार महिन्यांनी फरिदाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बुधवारी आरोपींना दोषी ठरवलं.

२१ वर्षीय तरुणीची २६ ऑक्टोबरला हरियाणामधील फरिदाबाद जिल्ह्यात दिवसाढवळ्या गोळी घालून हत्या करण्यात आली होती. अपहरणाचा प्रयत्न फसल्यानंतर ही हत्या करण्यात आली होती. तौसिफ आणि रेहान यांनी अपहरणाचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा निकिताने विरोध केला तेव्हा तौसिफने बंदूक काढली आणि गोळी चालवली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.

पोलिसांनी अटक केल्यानंतर तौसिफने पोलिसांनी निकिता दुसऱ्याशी लग्न करणार असल्याने आपण हत्या केल्याचं सांगितलं होतं. निकिताच्या कुटुंबाने २०१८ मध्ये दाखल केलेल्या केसमुळे आपलं करिअर उद्ध्वस्त झाल्याचा दावाही तौसिफने केला होता. “अटक झाल्याने मी मेडिसिनचा अभ्यास करु शकलो नाही. यामुळे मी बदला घेतला,” असं तौसिफने म्हटलं होतं.

हत्येनंतर एसआयटीने तपास हाती घेतला होता. तौसिफ लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप कुटुंबाने केल्याने पोलिसांनी लव्ह जिहादच्या अँगलनेही तपास केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2021 6:17 pm

Web Title: haryana court convicts tausif rehan in nikita tomar murder case sgy 87
Next Stories
1 “मला तोंड उघडायला लावू नका, १०० कोटींची वसुली…”; राज्यसभेत काँग्रेस खासदारांवर संतापले ज्योतिरादित्य शिंदे
2 महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी; सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात
3 देहविक्री करण्यास नकार देणाऱ्या पत्नीसोबत पतीचं पाशवी कृत्य; घटना ऐकून पोलीसही चक्रावले
Just Now!
X