हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांच्या जामिनासाठी ज्या व्यक्तीने हमी दिली होती त्याने ती मागे घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर चौताला यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पुन्हा ताब्यात घेण्यात आले. हरयाणातील शिक्षक भरती घोटाळ्यात चौताला यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. चौताला यांना जामीन मंजूर करताना त्यांच्यासाठी सूरजितसिंग या व्यक्तीने हमी दिली होती.  मात्र वैयक्तिक कारणास्तव आपण यापुढे हमी देऊ शकत नसल्याचा त्यांनी केलेला विनंती अर्ज न्यायाधीश संजय गर्ग यांनी स्वीकारला. त्यानंतर चौताला यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले.