News Flash

हरयाणात भाजपा सरकार, मनोहर लाल खट्टर रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी भारतीय जनता पार्टीला पुढचे सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले आहे.

संग्रहित छायाचित्र

हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी भारतीय जनता पार्टीला पुढचे सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ही माहिती दिली. दृष्यंत चौटालांच्या जननायक जनता पार्टीच्या पाठिंब्याने भाजपा हरयाणात सरकार स्थापन करणार आहे. रविवारी शपथविधीचा सोहळा होणार आहे. हरयाणाच्या राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केलं आहे असे मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले.

रविवारी दुपारी २.१५ च्या सुमारास शपथविधीचा कार्यक्रम होईल अशी माहिती खट्टर यांनी दिली. दृष्यंत चौटाला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत असे खट्टर यांनी सांगितले. भाजपाचे ४०, जेजेपीचे १० आणि सात अपक्ष असे एकूण ५७ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणार असल्याचे खट्टर म्हणाले.

मनोहरलाल खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी आपला राजीनामा राज्यपालांना सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यापालांनी खट्टर यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम संभाळण्यास सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 4:59 pm

Web Title: haryana governor invites bjp led coalition to form govt dmp 82
Next Stories
1 मोदींच्या गुजरातमध्येही काँग्रेस सोडून भाजपा गेलेल्या दोन मोठ्या नेत्यांचा झाला पराभव
2 दहा जागा जिंकणाऱ्या जेजेपीला भाजपानं दिलं उपमुख्यमंत्रीपद; शिवसेनेचं काय होणार?
3 काश्मीरच्या राज्यपालपदावरून मलिक यांची उचलबांगडी
Just Now!
X