26 February 2021

News Flash

एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू, गुरूग्राममध्ये खळबळ

मृतांमध्ये अवघ्या एका वर्षाच्या मुलीचाही समावेश असून या चिमुकलीचा मृत्यू रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना झाला

(फोटो क्रेडिट - एएनआय)

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये अवघ्या एका वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. पतौडी तालुक्यातील ब्रीजपुरा गावामध्ये बुधवारी रात्रीच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले आहेत.


वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये अवघ्या एका वर्षाच्या मुलीचाही समावेश असून या चिमुकलीचा मृत्यू रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना झाला. तर, एका महिलेचा मृतदेह मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आणि अन्य दोन मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत होते. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्याप संभ्रम असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 9:21 am

Web Title: haryana gurugram family of four including one year old toddler found dead under mysterious circumstances
Next Stories
1 सर्व भाजपाविरोधी नेत्यांना कारागृहात पाठवले जाणार: लालूप्रसाद यादव
2 बांगलादेश : महिला पत्रकाराची घरात घुसून निर्घृण हत्या
3 ‘राहुल गांधींचा RSSच्या कार्यक्रमाला जाण्याचा प्रश्नच नाही’
Just Now!
X