08 August 2020

News Flash

…म्हणून नवविवाहित डॉक्टरच अ‍ॅप्रन घालून रुग्णलयासमोर विकतोय चहा

हा डॉक्टर अ‍ॅप्रन घालून आपल्या पत्नीबरोबर चहाविक्री करत आहे

(फोटो सौजन्य: दैनिक भास्कर)

हरियाणामधील कर्नाल शहरामधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथील एक तरुण डॉक्टरने आपल्या नवविवाहित पत्नीसोबत रस्त्याच्या कडेला चहाविक्रीचा उद्योग सुरु केला आहे. एका खासगी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या या तरुण डॉक्टरने रुग्णालय प्रशासनाकडे दोन महिन्यांपासून पगार मिळाला नसून तो देण्यात यावा अशी मागणी केली. त्यानंतर प्रशासनाने आपल्याला नोकरीवरुन काढून टाकल्याचा आरोप या डॉक्टरने केला आहे. यासंदर्भातील वृत्त पंजाब केसरीने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांचा अ‍ॅप्रन घालून रस्त्याच्याकडेला चहा विक्री करणाऱ्या या व्यक्तीचे नाव गौरव वर्मा असं आहे. दोन महिन्यापासून आपल्याला पगार न मिळाल्याने यासंदर्भात चौकशी केली असता माझी बदली करण्यात आली. त्यानंतर या बदलीचा मी विरोध केला तर मला नोकरीवरुन काढून टाकण्यात आला असं आरोप गौरवने केला आहे. नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर आता गौरवने सेक्टर १३ मध्ये चहाची टपरी सुरु केली आहे. या टपरीवर तो डॉक्टरचे अ‍ॅप्रन घालून चहा विकतो. सरकारने संबंधित रुग्णलयावर कारवाई करावी अशी मागणी गौरवने केली आहे.

रुग्णालय ज्या कंपनीच्या मालकीचे आहे त्या कंपनीमधील वरिष्ठांशी संवाद साधण्याचा प्रयत्नही या डॉक्टरने केला. मात्र माझं कोणतही म्हणणं ऐकून घेण्यात आलं नाही असाही आरोप गौरवने केला आहे. पगारबद्दल चौकशी करताच गौरवची बदली गाझियाबादमधील कंपनीच्या दुसऱ्या रुग्णालयात करण्यात आली. याला विरोध केल्यानंतर नोकरीवरुन काढून टाकण्याचे पत्रच गौरवला मिळालं. यासंदर्भात गौरवने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडेही रितसर तक्रार केली आहे. मात्र त्यालाही काहीच उत्तर मिळालेले नाही. अखेर संतापलेल्या गौरवने रुग्णालयाच्या गेटसमोरच चहाचे दुकान सुरु केलं आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक असणाऱ्या डॉक्टर अश्विनी अहूजा यांनी या प्रकरणाची आपल्यापर्यंत तक्रार आल्याचे सांगितले आहे. या प्रकरणासंदर्भात सध्या कोणतेही मत देणे चुकीचे ठरेल. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतरच याबद्दल मत व्यक्त करता येईल. चौकशीनंतरच मी याबद्दल काही बोलू शकेन. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, अशी माहिती अश्विनी यांनी दिली.

कर्नालमधील रुग्णालयाचे प्रमुख असणाऱ्यांनी सध्या लॉकडाउन सुरु असल्याने डॉक्टरांना पगार देण्यात अडचणी येत आहेत असं म्हटलं आहे. डॉक्टर गौरवने लावलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. गौरव यांना अनेकदा बेकायदेशीर काम करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. या संदर्भात त्यांना तीन ते चार नोटीस पाठवून अनेकदा समजही देण्यात आली आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गौरवला भेटून बोलण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी गौरवने भेटण्यास नकार दिला. गौरवला रुग्णालय प्रशासनाशी काही अडचण असल्याच बसून चर्चा करुन यासंदर्भातील उपाय शोधता येईल असं मत रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 9:20 am

Web Title: haryana karnal hospital not giving salary to a doctor protest making tea with his wife scsg 91
Next Stories
1 भीषण परिस्थिती, आई-वडिलांसोबत बस पकडण्यासाठी पळणाऱ्या सहा वर्षाच्या मुलीला ट्रकने चिरडलं
2 Video: दुपारच्या जेवणावरुन पत्नीबरोबर झालेल्या वादानंतर ‘त्याने’ घेतला आत्महत्या करण्याचा निर्णय पण…
3 भारत-चीनमध्ये तणाव, सीमेवर बिघडू शकते परिस्थिती
Just Now!
X