News Flash

महामार्गावर कारमधून बाहेर खेचून महिलेवर बलात्कार; पाच नराधमांना अटक

गुरुग्राममध्ये भाड्याच्या खोलीत राहणारी महिला तिच्या पतीसह रविवारी गुरुग्राममध्ये गेली होती.

संग्रहित छायाचित्र

हरयाणामधील गुरुग्राम येथे २२ वर्षांच्या महिलेला कारमधून बाहेर खेचून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुरुग्राममध्ये भाड्याच्या खोलीत राहणारी महिला तिच्या पतीसह रविवारी गुरुग्राममध्ये गेली होती. रात्री उशिरा पीडित महिला, तिचा पती आणि दिर घरी परतण्यासाठी निघाले. सेक्टर ५७ येथे त्यांनी कार थांबवली. महिलेचा पती लघुशंकेसाठी गेला होता. तर दिर पाण्याची बॉटल आणायला गेला होता. यादरम्यान दोन कार तिथे येऊन थांबल्या. कारमधून पाच जण उतरले आणि त्यांनी महिलेचा पती व दिराशी वाद घालायला सुरुवात केली. यादरम्यान मुख्य आरोपी संजीतने महिलेला कारबाहेर खेचले आणि रस्त्यालगतच्या झाडा-झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कारानंतर नराधमांनी तिथून पळ काढला. मात्र, पीडितेच्या पतीने कारचे नंबर टिपले आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी कारचा शोध घेतला आणि पाचही नराधमांना अटक केली. तपास करणाऱ्या पोलीस पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजीतने महिलेला कारबाहेर खेचले. त्यावेळी अन्य चार आरोपींना संजीत काय करत आहे याची कल्पना देखील नव्हती.  संजीत महिलेवर बलात्कार करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 5:30 pm

Web Title: haryana woman dragged out of car raped on roadside in gurgaon five arrested
Next Stories
1 Narendra Modi at WEF: तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा: पंतप्रधान मोदी
2 लोकसभा निवडणुकीपूर्वी आरएसएसमध्येही होणार मोठे बदल, युवकांना मिळणार संधी
3 हादियाचे सक्तीने धर्मांतर झाले का ते शोधा?, विवाहाचा संबंध नाही: सुप्रीम कोर्ट
Just Now!
X