News Flash

शमीला दिलासा, हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली

मोहम्मद शमी मुलीचा खर्च उचलण्यासाठी आधीपासूनच तयार होता असे त्याच्या वकिलांनी सांगितले आहे.

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीला न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्याच्या पत्नीने अर्थात हसीन जहाँने पोटगीची रक्कम म्हणून महिना ७ लाख रूपये मिळावेत असा अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. अलीपूर कोर्टाने हसीन जहाँचा पोटगीची याचिका फेटाळत शमीच्या बाजूने निर्णय दिला. शमीला आता त्याच्या मुलीसाठी ८० हजारांचा भत्ता द्यावा लागणार आहे. मोहम्मद शमी मुलीचा खर्च उचलण्यासाठी आधीपासूनच तयार होता असे त्याच्या वकिलांनी सांगितले आहे.

दरम्यान अलीपूर कोर्टाने दिलेला निर्णय मान्य नसल्याने हसीन जहाँच्या वकिलांनी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद शमीपासून विभक्त झाल्यापासून हसीन जहाँने पुन्हा एकदा मॉडेलिंगच्या विश्वात पाऊल ठेवले आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ या दोघांमधले भांडण चांगलेच चव्हाट्यावर आले होते. हसीन जहाँने मोहम्मद शमीचे व्हॉट्स अॅप मेसेज, फेसबुक मेसेंजरवरचे मेसेज यांचे स्क्रीन शॉट पोस्ट करत त्याचे दुसऱ्या महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला. तसेच पत्रकार परिषद घेऊन विविध आरोप केले. मोहम्मद शमीच्या कुटुंबीयांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला असाही आरोप हसीन जहाँने केला होता.

मोहम्मद शमीला सुधारण्यासाठी मी अनेक संधी दिल्या पण त्याने ऐकले नाही. त्याच्या घरातल्या लोकांनी माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला. मी सगळे सहन करत होते, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही असेही हसीनने म्हटले होते. तर मोहम्मद शमीने आमच्या दोघांमध्ये एक तिसरा व्यक्ती आला आहे जो हसीनला माझ्या विरोधात भडकावत आहे असे म्हटले होते. मला काहीही सिद्ध करायचे नाही जे काही सिद्ध करायचे आहे ते हसीन जहाँ करेल कारण माझ्यावर आरोप तिने केले होते असेही शमीने म्हटले होते. या सगळ्या प्रकारानंतर हे दोघे वेगळे राहू लागले. ज्यानंतर हसीन जहाँने पोटगीची याचिका दाखल करत दर महिन्याला शमीने ७ लाख रूपये द्यावे असे म्हटले होते. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 10:02 am

Web Title: hasin jahan loses maintenance litigation against husband mohammed shami
Next Stories
1 Kerala floods: अॅमेझॉनवर क्लिक करा आणि पाठवा केरळच्या पूरग्रस्तांना मदत
2 Kerala Floods: …तर ५० हजार लोकांचा बळी जाईल, आमदाराचं भावनिक आवाहन
3 अटलजींबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या प्राध्यापकाला मारहाण
Just Now!
X