काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांची गाडी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना घेऊन घटनास्थळावरुन रवाना झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. काँग्रेसकडून पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे. सोशल नेटवर्किंगवरही काँग्रेसच्या समर्थकांनी #डरपोक_योगी या हॅशटॅगच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकारच्या या कारवाईचा विरोध केला आहे. राहुल यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर अवघ्या तासामध्ये #डरपोक_योगी या हॅशटॅगवर २० हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. पीडितेच्या नातेवाईकांना भेटायला जाणं गुन्हा आहे का?, योगी सरकार नक्की कशाला घाबरतयं असे अनेक प्रश्न काँग्रेस समर्थकांनी ट्वीटरवरुन उपस्थित केले आहेत.

राहुल गांधांनी ताब्यात घेण्याआधी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. राहुल यांच्या गाड्यांचा ताफा आडवल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चालतच हाथरसच्या दिशेने रवाना झाले. मात्र राहुल यांना पोलिसांकडून पुन्हा आडवण्यात आलं आणि त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी लाठीचार्जही केल्याचं राहुल यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी पोलिसांनी आपल्याला खाली पाडल्याचंही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. सगळ्या गोंधळानंतर नोएडा पोलीस राहुल आणि प्रियंका यांना गाडीने पुन्हा नवी दिल्लीच्या दिशेने घेऊन गेले. या कारवाईनंतर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. हाच प्रश्न काँग्रेस समर्थकांनी सोशल नेटवर्किंगवर विचारताना #डरपोक_योगी या हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे.

न्याय मागितला म्हणून…

चालत जाणाऱ्यांना का आडवलं?

त्यांचा गुन्हा काय?

पोलिसांचा वापर केला

त्यांना फक्त पीडितेच्या कुटुंबाला भेटायचं होतं

अहिंसा

ही लोकशाही

घाबरले

आधी पुरावा आणि आता न्याय

शक्तीचा वापर

कायदा सुव्यवस्थेचं काय?

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना सोबत देण्यासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान हाथरस जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.