01 March 2021

News Flash

हाथरस प्रकरण: भीम आर्मीचे प्रमुख आझाद यांच्यासह ५०० काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात FIR

जमावबंदीचं कलम १४४ आणि एपिडेमिक अॅक्टचा भंग केल्याचा आरोप

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. २९ सप्टेंबरला रात्री उशिरा या पीडित मुलीचा अंत झाला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांची संमती न घेता ही बाब घडली. त्यानंतर या घटनेचा निषेध नोंदवत काँग्रेस, आप आणि भीम आर्मीने आंदोलन केलं. या प्रकरणी आता काँग्रेसचे ५०० कार्यकर्ते आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीचं कलम १४४ आणि एपिडेमिक अॅक्टचा भंग केल्याचा गुन्हा या सगळ्यांविरोधात आहे. एकूण ४०० जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

कलम १४७, कलम ३४१, १८८, २६९ या कलमांन्वये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगलीसाठी चिथावणी, सामाजिक नियमांचा भंग, रोग संसर्ग पसरण्यासारख्या कृती हे गुन्हे दाखल आहेत. असेच गुन्हे काँग्रेसच्या सुमारे ५०० कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आंदोलन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी हाथरस बलात्कार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौन कधी सोडणार असा प्रश्न विचारला आहे. तर आज आपचे नेते संजय सिंह हे जेव्हा हाथरस या ठिकाणी आले होते. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते परतत असताना त्यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. त्यांचा निषेध करणाऱ्या घोषणाही देण्यात आल्या.

हाथरस या ठिकाणी १९ वर्षांच्या दलित तरुणीवर बलात्कार झाला. तिला मारहाण करुन तिची जीभही छाटण्यात आली. त्यानंतर या पीडितेवर दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र २९ सप्टेंबरच्या रात्री उशिरा तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर या पीडितेचा मृतदेह पोलिसांनी जाळला. ज्यावरुन उत्तर प्रदेशातला आक्रोश हा देशभरात पोहचलं. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हे पहिल्यांदा हाथरसला पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहचले तेव्हा त्यांना अडवण्यात आलं. एवढंच नाही तर राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोपही झाला. त्यानंतर काँग्रेसने देशभरातल्या विविध ठिकाणी आंदोलनं केली. आता उत्तर प्रदेशच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 10:03 pm

Web Title: hathras case firs against azad congress workers aap leader sanjay singh scj 81
Next Stories
1 राहुल गांधी व्हीआयपी शेतकरी, जे ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी सोफा वापरतात – स्मृती इराणी
2 भारत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ग्लोबल हब’ व्हावा ही इच्छा-नरेंद्र मोदी
3 आज रात्रीपर्यंत राज्यांमध्ये उपकराचे २० हजार कोटी वितरीत करणार, केंद्राचं महत्त्वाचं पाऊल
Just Now!
X