News Flash

“हाथरस पीडितेवर मध्यरात्री अंत्यसंस्कार करुन तुम्ही…,” अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारलं

"कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली तडजोड केली जाऊ शकत नाही"

संग्रहित (PTI)

हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यासंबंधी उत्तर प्रदेश प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उत्तरांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने असामाधन व्यक्त केलं आहे. न्यायालयाने संपूर्ण घटनाक्रमावर नाराजी व्यक्त केली असून पीडित तसंच तिच्या कुटुंबाच्या मानवाधिकार आणि मुलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं असल्याचं सांगत स्थानिक प्रशासनाला फटकारलं आहे. लाइव्ह लॉने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“भारतात माणुसकीच्या धर्माचं पालन केलं जातं. येथे प्रत्येकजण एकमेकांच्या जीवन आणि मृत्यूचा आदर करणं अपेक्षित आहे. सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरुन पीडितेचा मृतदेह कुटुंबाकडे न सोपवता किंवा स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून त्यांची परवानगी घेता जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचं दिसत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबाच्या मानवाधिकार आणि मुलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं आहे,” असं न्यायालयाने सांगितलं. न्यायमूर्ती पंकज मितल आणि राजन रॉय यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी न्यायालयाने अतिरिक्त मुख्य सचिवांना (गृह) पुढील सुनावणीत यासंबंधी धोरण सादर करण्याचा आदेश दिला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मृतदेह कुटुंबाकडे का सोपवण्यात आला नाही याचं कोणतंही योग्य कारण देण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्याचं निदर्शनास आणून दिलं.

“पीडितेवर त्यांच्या परंपरा, रितींप्रमाणे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार होणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली त्याच्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही,” असंही न्यायालयाने यावेळी सांगितलं. न्यायालयाने सुनावणीदरम्यान पीडितेच्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेण्याचा आदेश राज्य प्रशासनाला दिले आहेत. तसंच एसआयटी किंवा सीबीआय कोणीही तपास केला तरी माहिती पूर्पणणे गुपित ठेवली जावी असंही स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 10:02 pm

Web Title: hathras victim late night cremation was violation of human rights of the woman and her family says allahabad high court sgy 87
Next Stories
1 भारतीय अर्थव्यवस्थेत १०.३ टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज
2 ज्यानं पेट्रोलनं पेटवलं त्यालाच घट्ट धरून ठेवलं; त्याच्यासह करोनायोद्धा नर्सचा मृत्यू
3 उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करुन देणाऱ्या राज्यपालांवर ओवेसी संतापले, म्हणाले…
Just Now!
X