11 July 2020

News Flash

देवयानी खोब्रागडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

व्हिसा अर्जात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अमेरिकी प्रशासनाची नाराजी ओढवून घेणाऱ्या माजी राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

| December 21, 2014 12:56 pm

व्हिसा अर्जात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अमेरिकी प्रशासनाची नाराजी ओढवून घेणाऱ्या माजी राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाची पूर्वपरवानगी न घेताच प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करणे तसेच स्वत:च्या दोन्ही मुलींची पारपत्रे तयार करून घेतल्याप्रकरणी खोब्रागडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
घरकामाला मोलकरीण ठेवताना तिची पुरेशी माहिती व्हिसा अर्जात न दिल्याने जानेवारी महिन्यात देवयानी यांना अमेरिकी प्रशासनाने अटक केली होती. तसेच त्यांना अमेरिका सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून देवयानी मायदेशात आहेत.
विदेश सेवेत असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांना विदेशात जशी वागणूक देण्यात येते तशीच वागणूक भारतात असलेल्या विदेश सेवेतील विदेशी अधिकाऱ्यांना देण्यात यावी. – देवयानी खोब्रागडे,
 अकोल्यात बोलताना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2014 12:56 pm

Web Title: have not violated any rules only clarified stand on charges of illegal passports devyani khobragade
Next Stories
1 इंफाळमध्ये स्फोटात तीन ठार, चार जखमी
2 जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लिम कारणीभूत- अशोक सिंघल
3 झारखंडमध्ये भाजप, काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा?
Just Now!
X