News Flash

पाकिस्तानमध्ये बेपत्ता झालेले निजामुद्दीन दर्ग्याचे मौलवी २० मार्चला भारतात परतणार

पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले वृत्त

निजामुद्दीन दर्ग्याचे मौलवी सध्या कराचीत आहेत

पाकिस्तानमध्ये बेपत्ता झालेले दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्यामधील दोन मौलवी भारतात लवकरच परतणार आहेत अशी माहिती पाकिस्तानच्या माध्यमांनी दिली आहे. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर ते दोघे बेपत्ता झाले होते. सध्या ते कराची येथे असून २० मार्चला ते भारतात परतणार असल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. मौलवी बेपत्ता होण्यामागे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याची चर्चा होती. त्यामुळे भारतामध्ये चिंतेचे वातावरण होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील या प्रकाराची दखल घेत पाकिस्तान सरकारला या दोघांची माहिती द्यावी अशी विनंती केली होती.

दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्यामधील ८० वर्षांचे मौलवी सय्यद आसीफ निझामी आणि त्यांचे पुतणे नाझिम अली निझामी हे दोघे ८ मार्च रोजी पाकिस्तानमध्ये गेले होते. धार्मिक यात्रेसाठी ते पाकिस्तानमधील लाहोरमध्ये मशहूर दाता दरबार दर्गामध्ये गेले होते. तिथून त्यांना कराचीला जायचे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसीफ यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने ते कराचीला गेले. तर नाजिम यांच्याकडील कागदपत्रे अपुरी असल्याने त्यांना लाहोर विमानतळावरच थांबवण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. नाजिम हे लाहोर विमानतळावरुन तर आसीफ हे कराची विमानतळावर गेल्यापासून त्यांच्याशी संपर्क साधता आला नव्हता.

मौलवी नाजीम यांचे पाकिस्तानमधील नातेवाईक वजीर निजामी यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना लाहोर विमानतळावरुन फोन आला होता. एका व्यक्तीने त्याचे नाव सांगितले नाही, पण नाजिम यांना ताब्यात घेतल्याचे त्याने फोनवर सांगितल्याचे वजीर निजामी म्हणालेत. लाहोर विमानतळावर आसिफ यांना घेण्यासाठी गेलो होतो. बराच वेळ थांबूनही ते विमानतळावरुन बाहेर आले नाही. शेवटी मी चौकशी केली असता काही लोक येऊन त्यांना घेऊन गेल्याचे विमानतळावरील अधिका-यांनी सांगितल्याचे वजीर यांनी नमूद केले. सुषमा स्वराज यांनीदेखील याप्रकरणाची दखल घेतली असून पाकिस्तान सरकारने या दोघांविषयीची माहिती द्यावी असे स्वराज यांनी म्हटले होते. इस्लामाबादमधील भारतीय दुतावासानेही हा मुद्दा पाकिस्तान सरकारकडे मांडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 8:39 pm

Web Title: hazarat nizamuddin dargah clerics return india pakistan karachi
Next Stories
1 विज्ञानशाखेचा पदवीधर ते मुख्यमंत्री, योगी आदित्यनाथ यांचा प्रवास
2 अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचे निधन
3 मानेसर ‘मारुती-सुझूकी’ हिंसाचार प्रकरणात १३ जणांना जन्मठेप
Just Now!
X