29 November 2020

News Flash

HDFC चे कोट्यवधी खातेधारक वैतागले, सलग दुसऱ्या दिवशी महत्त्वाच्या सेवा ‘डाऊन’

आज पुन्हा एकदा बँकेने खातेधारकांना होणाऱ्या त्रासाबाबत दिलगीरी व्यक्त केली असून...

देशातील मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेची नेट बँकिंग सेवा सलग दुसऱ्या दिवशी मंदावली आहे. सोमवारपासूनच खातेधरकांना नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. या दोन्ही महत्त्वाच्या सेवा डाऊन झाल्यामुळे खातेधारक आपल्या अकाउंटमध्ये लॉगइन करु शकत नाहीयेत, परिणामी अनेक महत्त्वाची कामं प्रलंबित राहिल्यामुळे खातेधारक वैतागले आहेत. ट्विटरवर  #hdfcbank आणि #hdfcbankdown असे हॅशटॅग वापरुन युजर्स संताप व्यक्त करतायेत.

महीन्याच्या सुरुवातीलाच या सेवांमध्ये अडचणी येत असल्याने बिल पेमेंट किंवा अन्य व्यवहारांमध्ये खातेधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. सोमवारीही बँकेची नेटबँकिंग सेवा अनेक तास मंदावली होती. संध्याकाळी 6.15 वाजता एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटर हँडलवरुन सेवांमध्ये अडचणी असल्याची माहिती दिली होती. रात्री उशीरापर्यंत सेवा पूर्ववत झाल्या नव्हत्या. तांत्रिक कारणांमुळे खातेधारकांना नेटबँकिंग व मोबाइल बँकिंग अॅपमध्ये लॉगइन करता येत नाहीये असं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा बँकेने खातेधारकांना होणाऱ्या त्रासाबाबत दिलगीरी व्यक्त केली असून तज्ज्ञांकडून समस्या सोडवण्याचे शर्थीचे प्रय़त्न सुरू असल्याची माहिती दिली आहे. लवकरच सर्व सेवा पूर्ववत होतील असं बँकेने आश्वस्त केलं आहे.

यापूर्वी एचडीएफसी बँकेने आपलं नवं मोबाइल अ‍ॅप लाँच केलं होतं, त्यावेळीही काही ग्राहकांना अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला होता. नवीन अ‍ॅप लाँच केल्यामुळे जुनं अ‍ॅप कंपनीने गुगल प्ले-स्टोअरवरुन हटवल्याने खातेधारकांना अधिक समस्या जाणवत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 1:52 pm

Web Title: hdfc bank net banking and mobile app down for 2nd day in row sas 89
Next Stories
1 धुम्रपान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘या’ कंपनीने दिली भन्नाट ऑफर
2 गायींना येतो ‘स्ट्रेस’; त्यावर शोधला टेक्नॉलॉजीने उपाय
3 मोबाइल फोन चार्जिंगसाठी भन्नाट जुगाड, महिंद्रांनीही करुन पाहिला हा प्रयोग
Just Now!
X