‘लॅन्सेट’च्या अहवालातील निष्कर्ष

आरोग्यसेवेचा दर्जा व लोकांना असलेली त्याची उपलब्धता यात १९५ देशांत भारताचा १४५ वा क्रमांक लागला आहे. चीन,  बांगलादेश, श्रीलंका, भूतान या  शेजारी देशांच्याही भारत मागे आहे, असे लॅन्सेटच्या अहवालात म्हटले आहे. दी ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस या अभ्यास अहवालात दिलेल्या माहितीनुसार १९९० पासून भारतात आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होत आहेत. २०१६ मध्ये भारताचा आरोग्य सेवा उपलब्धता व दर्जा गुणांक ४१.२ झाला आहे तो १९९० मध्ये २४.७ होता. एचएक्यू निर्देशांक २००० ते २०१६ द रम्यान सुधारला असला तरी उच्चतम व नीचतम गुणांक हे यातील फरक १९९० मध्ये २३.४ तर २०१६ मध्ये ३०.८ होता. गोवा व केरळ यांचा २०१६ मधील गुणांक ६० पेक्षा अधिक होता तर उत्तर प्रदेश व आसामचा गुणांक ४० च्या खाली होता. भारत यात चीन (४८), श्रीलंका (७१), बांगलादेश (१३३), भूताना (१३४) यांच्यापेक्षा मागे आहे तर नेपाळ (१४९), पाकिस्तान (१५४) , अफगाणिस्तान (१९१) यांच्यापेक्षा पुढे आहे. ज्या पाच देशांनी आघाडी घेतली आहे, त्यात २०१६ च्या आकडेवारीनुसार आइसलँड (९७.१), नॉर्वे (९६.६), नेदरलँडस (९६.१) लक्झेमबर्ग (९६), फिनलँड व ऑस्ट्रेलिया ( ९५.९) यांचा समावेश आहे.

सर्वात कमी गुणांकाच्या देशात मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक ( १८.६) , सोमालिया (१९.६), गिनीया बिसाऊ (२३.४), चॅड (२५.४), अफगाणिस्तान (२५.९) यांचा समावेश आहे. मृत्यूच्या बत्तीस कारणात आरोग्य सुविधेची उपलब्धता यात लक्षात घेतली असून शून्य ते १०० गुणांकादरम्यान मोजमाप केले आहे.

भारत अपयशी

क्षय, हृदयाचा संधीवात, इस्किमिक हार्ट डिसीज, पक्षाघात, वृषणाचा कर्करोग, आतडय़ाता कर्करोग, मूत्रपिंडाचे रोग यात भारताची कामगिरी निराशाजनक आहे. भारत व चीन यांच्यात उत्पन्न भरपूर असले तरी सेवेत खूप असमानता आहे. अमेरिका व ब्रिटन यांच्यात तीच परिस्थिती आहे. व्यक्तिगत आरोग्य सेवा उपलब्धतेत चीन व भारत यांच्यात देशांतर्गत पातळीवर असमानता आहे. आरोग्य सेवा उपलब्धता व दर्जा यात चीन व भारत यांच्यात ४३.५ व ३०.८ गुणांकांचा फरक आहे. जपानमध्ये फरक ४.८ गुणांकाचा आहे. २०१६ च्या आकडेवारीनुसार एकूण आरोग्यसेवा उपलब्धता व दर्जाचा सरासरी गुणांक ५४.४ आहे तो इ.स. २००० मध्ये ४२.४ होता.