News Flash

राष्ट्रपती कोविंद यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया

रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गेल्या शुक्रवारी लष्कराच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हृदयावर मंगळवारी येथील एम्स रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गेल्या शुक्रवारी लष्कराच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी त्यांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष आहे, असेही निवेदनामध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 12:40 am

Web Title: heart surgery on president kovind abn 97
Next Stories
1 देश पुन्हा करोनाआपत्तीच्या मार्गावर…
2 करोनाप्रतिबंधासाठी आंतरराष्ट्रीय कराराचे आवाहन
3 ‘काँग्रेस-द्रमुक’कडून महिलांचा अवमान- मोदी
Just Now!
X