News Flash

उत्तर भारतात उष्णतेची लाट; राजधानी दिल्लीसह इतर राज्यांसाठी ‘रेड अलर्ट’

दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला

देशभरात तापमानात खूपच वाढ झाली असून अनेक शहरांचा पारा हा ४४ पार गेला आहे. दरम्यान, उत्तर भारतात उष्णतेची लाट आली असून राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि चंदीगड या राज्यांना २५ आणि २६ मे रोजी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या काळात दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान विभागाकडून नागरिकांना देण्यात आला आहे.

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली असून महाराष्ट्र आणि तेलंगाणीतील काही भागांमध्ये देखील पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पूर्व उत्तर प्रदेशचा भाग उष्णतेच्या लाटेचा अनुभव घेत असून या राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या उष्णतेच्या लाटेचा येत्या पाच दिवसांत सर्वाधिक फटका पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगाणा या भागांना बसणार आहे. दिल्ली हवामान खात्याने २५ मे रोजी दिलेल्या हवामान बुलेटिनमध्ये ही बाब सांगण्यात आली आहे. विभागीय हवामाना खात्याचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी लोकांना इशारा देताना म्हटले की, “कुणीही दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये. त्याचबरोबर येत्या ३ ते ४ दिवसांत ओडीशा, छत्तीसगड, गुजरात, मध्य मध्य प्रदेश, मराठवाडा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, कर्नाटकच्या उत्तर भारतात उष्णेतेची लाट लावण्यात येणार आहे.”

उष्णतेची लाट ही त्यावेळी मानली जाते जेव्हा संबंधित शहरांमध्ये हवामान खात्याच्या केंद्रांवर किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त तापमान नोंदवलेले असेल. तसेच पठारी भागात ३७ डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त, तर किनारी भागात कमीत कमी ३० डिग्री आणि त्यापेक्षा जास्त तापमान हे डोंगराळ भागात नोंदवले गेले पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 10:20 am

Web Title: heat waves in northern india red alert for other states including capital delhi aau 85
Next Stories
1 आधी वाटलं सर्पदंशामुळे झाला अपघाती मृत्यू, मात्र नंतर समोर आलं सत्य अन्….
2 Cornavirus : चार भारतीय लस चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती
3 चिंताजनक! करोना रुग्णांच्या यादीत भारत १० व्या क्रमांकावर
Just Now!
X