News Flash

पाकिस्तानच्या गोळीबारात सुरक्षा दलाचा जवान जखमी

पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती सुरूच असून गेल्या ३६ तासांत शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करून भारतीय चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला.

| August 12, 2013 01:49 am

पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती सुरूच असून गेल्या ३६ तासांत शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करून भारतीय चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. रविवारीदेखील पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार सुरूच होता. या गोळीबारात गस्तीवर असलेला सीमा सुरक्षा दलाचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. जम्मू जिल्ह्य़ातील कानाचक भागातील अल्फा माचेल चौकीवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केल्याची माहिती वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर देत त्यांचा हल्ला परतवून लावला. यावेळी सीमा सुरक्षा दलाचा जवान पवन कुमार हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जम्मू वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. छातीत आणि पायाला गोळ्या लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पवन कुमारला उपचारासाठी दिल्लीतील एआयआयएमएस रुग्णालयात हलविण्यात आल्याचेही डॉक्टारांनी सांगितले. दरम्यान, पाच ऑगस्ट रोजी जम्मूतील सांबा क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे मुख्य हवालदार राम निवास मीना यांचा रविवारी दिल्लीतील एआयआयएमएस रुग्णालयात मृत्यू झाला. तीनच दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले.
पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने स्वीकारावी, अशी आग्रहाची मागणी भारताने रविवारी केली. पाकिस्तानने शांतता प्रक्रियेला बाधा येईल असे कृत्य करू नये, असे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी पाकिस्तानला सुनावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 1:49 am

Web Title: heavy firing by pak in poonch sector soldier injured
Next Stories
1 काँग्रेसच्या हाती देश असुरक्षित
2 अरुण जेटलींना जम्मू विमानतळावर रोखले; मोदी संतापले
3 पाकिस्तानची वळवळ सुरूच; पुन्हा गोळीबार
Just Now!
X