News Flash

उत्तराखंडला पुन्हा पावसाचा तडाखा

जलप्रलयातून सावरणाऱ्या उत्तराखंड राज्याला मुसळधार पावसाचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसाने राज्याच्या राजधानीतील सर्व रस्त्यांवर पाणी साचून

| August 6, 2013 12:32 pm

जलप्रलयातून सावरणाऱ्या उत्तराखंड राज्याला मुसळधार पावसाचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसाने राज्याच्या राजधानीतील सर्व रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. राज्यातील सर्व नद्या आणि महत्त्वाच्या तलावांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
येत्या ४८ तासांत राज्यात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान केरळमध्येही अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ९ जण ठार झाले आहेत. कोची विमानतळही सध्या तात्पुरत्या स्वरूपात उड्डाणासाठी बंद करण्यात आला आहे. या भागात शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 12:32 pm

Web Title: heavy overnight rains in uttarakhand rivers close to danger mark
Next Stories
1 अबू सालेमचे प्रत्यार्पण अजूनही वैध; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
2 संसद भवन परिसर सुरक्षेसाठी विशेष कमांडो पथक
3 यूपीए सरकार कधी जागे होणार? – मोदींचा सवाल
Just Now!
X