29 September 2020

News Flash

बंगळुरू जलमय; अवघ्या पाच तासांत महिन्याचा पाऊस

नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला.

बंगळुरूमधील अनेक शाळांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. छायाचित्र: एएनआय

अवघ्या पाच तासांच्या मुसळधार पावसाने बंगळुरू जलमय झाले आहे. या पावसाने २४ तासांत झालेल्या सर्वाधिक पावसाचा मागील दोन दशकतील विक्रम मोडला आहे. यादरम्यान शहरात १८४ सेंटीमीटर पाऊस पडला. एका महिन्यात जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस या पाच तासांत पडला आहे. सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी पहाटे चारपर्यंत सलग पाऊस पडत होता.

राज्याच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात जेवढ्या पावसाची अपेक्षा करण्यात आली होती. त्याच्या ८८ टक्के पाऊस अवघ्या ५ तासांत झाला. मंगळवारी संपूर्ण दिवस काळे ढग आले होते आणि संध्याकाळी पाऊस पडला.

सोमवार आणि मंगळवार दरम्यान रात्री मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. पार्किगच्या जागेत रस्त्यावर पाणी आल्याने मंगळवारी सकाळी अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्याचबरोबर विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आल्याने नागरिक त्रस्त झाले होते. येदीपूर तलाव भरला असून बेलांदपूर मधील तलावाचे पाणी परिसरात घुसले आहे.

आयटी कंपन्यांचे हब म्हणून ओळख असलेल्या दक्षिण बंगळुरूत पावसाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. स्वातंत्र्य दिवस असल्यामुळे शाळा आणि कार्यालये बंद असल्यामुळे नागरिकांना जास्त त्रास झाला नाही.

अनेक भागात दुपारपर्यंत मंदगतीने वाहतूक सुरू होती. लालबाग परिसरात वाहतूक कोंडीचा मोठा त्रास झाला. मंगळवारी रात्रीपर्यंत अनेक भागात पाणी शिरले होते. बुधवारी कामाचा दिवस असल्यामुळे अनेकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तामिळनाडूच्या किनारपट्टीवर चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 6:50 pm

Web Title: heavy rain in bengaluru within 5 hours 184 cm rain fall
Next Stories
1 ‘भारताला हिंदुस्तान म्हणणाऱ्या मोदींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’
2 गुंगीचे औषध देऊन राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले
3 अंबानींच्या रिलायन्सला मोदी सरकारचा दणका; १७०० कोटींचा ठोठावला दंड
Just Now!
X