News Flash

नापाक हरकत! नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून तुफान गोळीबार

शांततेची भाषा करणाऱ्या पाकिस्तानच्या सीमेवरती नापाक कारवाया थांबलेल्या नाहीत. सलग आठव्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

नापाक हरकत! नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून तुफान गोळीबार

शांततेची भाषा करणाऱ्या पाकिस्तानच्या सीमेवरती नापाक कारवाया थांबलेल्या नाहीत. सलग आठव्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नियंत्रण रेषेवर पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून तुफान गोळीबार सुरु आहे.

पाकिस्तानच्या या गोळीबारात एक महिला जखमी झाली. पूँछ मधल्या नागरी भागांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानकडून हॉवित्झर १०५ एमएमचा वापर करण्यात येत आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबाराबरोबर मोर्टारही डागण्यात येत आहेत. भारताकडूनही पाकिस्तानच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पूँछच्या मानकोटी भागात नसीम अख्तर ही महिला जखमी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 7:48 pm

Web Title: heavy shelling by pakistan in areas along loc
Next Stories
1 मोदी पाच मिनिटंही प्रसिद्धीशिवाय राहू शकत नाहीत – राहूल गांधी
2 काश्मीरमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
3 MIG -21 चे सारथ्य करणे वर्थमान कुटुंबाची परंपरा, तीन पिढया हवाई दलात
Just Now!
X