21 September 2020

News Flash

हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवृष्टी

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्य़ाच्या एका खेडय़ात बर्फाचा कडा कोसळून एक महिला व तिच्या मुलासह चार जण ठार झाले.

| March 3, 2015 01:57 am

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्य़ाच्या एका खेडय़ात बर्फाचा कडा कोसळून एक महिला व तिच्या मुलासह चार जण ठार झाले. राज्यात जोरदार हिमपात आणि पाऊस यामुळे सामान्य जनजीवन अस्ताव्यस्त झाले.
हिमपात झालेल्या शिमला, मनाली, चंबा आणि पर्वतीय प्रदेश, तसेच किन्नौर व लाहौल-स्पिती या आदिवासी भागात तापमान शून्य अंशांहून कमी झाल्यामुळे सर्वत्र थंडीचे वातावरण कायम राहिले. यामुळे पिके आणि फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले. चंबा जिल्ह्य़ाच्या पांगी खेडय़ात पर्वतावरून खाली आलेला बर्फाचा कडा कुलू जिल्ह्य़ातील काद्री खेडय़ातील एका घरावर कोसळल्यामुळे एक महिला व तिचे बाळ मरण पावले. आणखी दोघांचा या वातावरणात मृत्यू झाला.
हिमाचल प्रदेशात अभूतपूर्व असा मुसळधार पाऊस पडल्याने १०१ वर्षांचा विक्रम मोडला गेला.   किन्नौरमधील काल्पा येथे ९५ सेंटिमीटरहून अधिक हिमवर्षांवाची नोंद झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 1:57 am

Web Title: heavy snowfall in himachal pradesh
Next Stories
1 अविवाहितांना अपत्यांबाबत बोलण्याचा काय अधिकार? – ओवेसींची संघावर टीका
2 निमंत्रकपदावरून केजरीवालना हटवणार?
3 खान त्रिकुटाच्या चित्रपटांवर बहिष्काराचे आवाहन
Just Now!
X