15 August 2020

News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनीही पाहिला शपथविधी सोहळा

अहमदाबाद येथील घरी टीव्हीवर हिराबेन यांनी हा सोहळा पाहिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. हा सोहळा टीव्हीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनीही पाहिला. या संदर्भातले वृत्त एएनआयने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयानंतरही आईची भेट घेत आशीर्वाद घेतले होते. आता ते दिल्लीत शपथविधी घेत असताना तो सोहळाही त्यांच्या आईने टीव्हीवर पाहिला.

निवडणूक होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर निवडणूक जिंकल्यावरही त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यात आईचे असलेले स्थान सगळ्या देशाला ठाऊक आहे. आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना तो सोहळा त्यांच्या आई हिराबेन यांनी टीव्हीवरून पाहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2019 7:46 pm

Web Title: heeraben modi mother of pm narendra modi watching the swearing in ceremony
Next Stories
1 टीम मोदीमध्ये अमित शाह यांचा केंद्रीय मंत्री म्हणून समावेश
2 टीम मोदींच्या शपथविधीला या दिग्गजांनी लावली हजेरी
3 विलीनीकरण नाही, शरद पवारांच्या सल्ल्यासाठी राहुल गांधींनी घेतली भेट
Just Now!
X