News Flash

व्हॉट्सअपवर गोमांसावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मुस्लिम युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू

मेंदूला सूज आल्यामुळे मिनाजचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

झारखंडमध्ये गोमांसवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मुस्लिम युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे.

झारखंडमध्ये गोमांसवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मुस्लिम युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. मिनाज अन्सारी (वय २२) असे मृत मुलाचे नाव असून एका व्हॉट्सअप ग्रूपवर त्याने गोमांसबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे पोलिसांनी अटक केली होती. रविवारी (दि.९) राजेंद्र इन्स्टिटूट ऑफ मेडिकल सायन्स येथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीत मिनाजचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर मेंदूला सूज आल्यामुळे मिनाजचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
तपास अधिकाऱ्यांनी काही गडबड केल्याचे काही पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच नारायणपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश पाठक यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर खून केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिनाजच्या कुटुंबीयांनी हरीश पाठक विरोधात तक्रारही दाखल केली आहे. त्याचबरोबर मिनाजच्या आईबरोबर गैरवर्तणूक केल्याचा आरोपही हरीश पाठकवर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन ऑक्टोबर रोजी गोमांसवरून एक व्हॉट्सअप मेसेज झारखंडमध्ये व्हायरल झाले होते. तक्रारीनंतर काही लोकांना पकडण्यात आले. चौकशीनंतर त्यातील काहींना सोडण्यात आले आणि मिनाजला अटक करण्यात आली. दोन दिवसानंतर मिनाजला उपचारासाठी धनबादला नेल्याचे मिनाजचे वडील उमर शेख यांना समजले. पोलीस कोठडीत मिनाज जखमी झाल्याची माहिती कुटुंबीयांना होती. सात ऑक्टोबरला मिनाजला राजेंद्र इन्स्टिटूट ऑफ मेडिकल सायन्स येथे दाखल करण्यात आले. दोन दिवसानंतर मिनाजचा मृत्यू झाला. याप्रकरणी तपास सुरू असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर मिनाजच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 11:23 am

Web Title: held for whatsapp message on beef youth dies in custody
Next Stories
1 प्रेमभंगाचा सूड उगवण्यासाठी ‘तिने’ प्रियकराच्या घरात ठेवले बॉम्ब
2 पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ x ७ ऑनड्युटी; अडीच वर्षात एकही सुट्टी नाही
3 Pampore Encounter: पम्पोर हल्ला: तिसऱ्या दिवशी लष्कराचे ऑपरेशन संपुष्टात, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X