News Flash

हेलिकॉप्टर खरेदी घोटाळाप्रकरणी कागदपत्रे इटलीहून मिळाली

अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी इटलीच्या ऑगस्टावेस्टलँड कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी काही नवीन कागदपत्रे पुढे आली आहेत. तपासकामातील सहकार्याचा एक भाग म्हणून ही कागदपत्रे इटलीतील

| February 25, 2013 02:07 am

अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी इटलीच्या ऑगस्टावेस्टलँड कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी काही नवीन कागदपत्रे पुढे आली आहेत. तपासकामातील सहकार्याचा एक भाग म्हणून ही कागदपत्रे इटलीतील सरकारी अधिकाऱ्यांकडूनच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) देण्यात आली आहेत. हेलिकॉप्टर खरेदी ऑगस्टावेस्टलँड कंपनीकडूनच व्हावी यासाठी एखाद्या भारतीय व्यक्तीला लाच देण्यात आली होती का, हे समजण्यासाठी या कागदपत्रांचा उपयोग होईल, असा अंदाज आहे.
मिलान येथून नुकत्याच परतलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका अधिकाऱ्याने, ३६०० कोटी रुपयांच्या या व्यवहारांसंबंधी काही कागदपत्रे इटलीतील सरकारी वकिलाकडून प्राप्त झाल्याचा दावा केला आहे. या कागदपत्रांचा तपास केल्यानंतर येत्या दोन दिवसांत प्राथमिक चौकशी सुरू होईल आणि त्यातूनच तपासकार्यास दिशा मिळेल, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या कागदपत्रांमध्ये नेमके काय आहे, याबाबत कोणताही तपशील उघड करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला असून, प्रथमदर्शनी तरी ही कागदपत्रे अज्ञात व्यक्तींविरुद्ध करावयाच्या तपासास योग्य ती दिशा देऊ शकतात, असे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सध्या तरी इटलीचे सरकार यापेक्षा अधिक कागदपत्रे देऊ शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, भारताततर्फे गेलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या पथकातील एक अधिकारी सोमवारी भारतात परतणार असून काही नवीन पुरावे उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 2:07 am

Web Title: helicopter purchase scam matter document recovered from italy
Next Stories
1 बामिटाल मालवेअरचा इंटरनेट प्रणालीवर हल्ला
2 ‘हिंदू दहशतवाद मुद्दय़ावर शिंदेंनी माफी मागितलेली नाही’
3 इजिप्तमध्ये संसदीय निवडणुका लवकरच
Just Now!
X