भारतातील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता अनेक देशांनी वैद्यकीय उपकरणांची मदत दिली आहे. आता भारतीय अमेरिकन डॉक्टरानीही मदतीचा हात पुढे केला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन फिजिशियन असोशिएशननं (फिपा) ५ हजार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. या मदतीमुळे करोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

भारताला मदत करण्यासाठी फिपानं ५ हजार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची खरेदी केली आहे. त्यापैकी ४५० युनिट अहमदाबाद, ३२५ युनिट दिल्ली आणि ३०० युनिट मुंबईला पोहोचले आहेत. हे सर्व युनिट रुग्णालयं, आयसोलेशन सेंटर, मोबाईल रुग्णालय. सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहेत, फिपाचे अध्यक्ष डॉ. राज भयानी यांनी ही माहिती दिली. जवळपास ३५०० युनिट भारतात लवकरच पोहोचतील असंही त्यांनी पुढे सांगितलं. यासाठी भारतीय राजदूतांसोबत संवाद सुरु असल्याचं ते बोलले. नागरी उड्डयन मंत्रालय आणि एअर इंडिया हे युनिट लवकरच भारतात पोहोचवतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ऑगस्ट २०२१ मध्ये ब्रिटन होणार करोनामुक्त! ब्रिटिश टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी सांगितलं कारण!

करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडव सुरु आहे. देशाच्या विविध भागात करोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. देशात दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रत्येकाची झोप उडवणारी आहे. देशात अवघ्या २४ तासांत चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद असून, २४ तासांत चार लाखांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोविड रुग्णालयांना दिलासा; दोन लाखांवरील बिलं रोखीने घेण्यास मूभा

करोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय धोरण तयार केलं होतं. यात आरटीपीसीआर चाचणीसह काही नियम घालून देण्यात आले होते. मात्र, मागील काही काळात रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तसेच रुग्णांना ओळखपत्र नसल्यानं प्रवेश नाकारला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. या घटनांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना रुग्णांना दाखल करून घेण्याबद्दलच्या राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत.