उत्तर कोरियाचे हुकुमशहा म्हणून ओळख असलेले किम जोंग उन सध्या बरेच चर्चेत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जोंड यांची नुकतीच भेट झाली. यामध्ये दोन्ही देशांशी निगडित असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. किम जोंग त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. कधी आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत तर कधी आणखी काही विषयांबाबत वक्तव्य करुन ते नवे वाद निर्माण करण्यात आघाडीवर असतात. पाहूयात त्यांनी केलेली अशाच काही वादग्रस्त वक्तव्ये…

– संपूर्ण अमेरिका ही आमच्या अण्विक शस्त्रांच्या रेंजमध्ये आहे. त्याचे बटण हे माझ्या डेस्कवर आहे. ही सत्य गोष्ट असून कोणतीही धमकी नाही.

– न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जोंग हे त्यांच्या लष्करी प्रतिभेसाठी बढाई मारत असतात. त्याच्या वाढदिवसाला प्रदर्शित करण्यात आलेल्या त्यांच्या लष्करी आयुष्याबाबत यामध्ये भाष्य करण्यात आले आहे.

– दक्षिण कोरियाचा अग्निचा सागर बनविण्याचा धोका जोंग यांना आहे. दक्षिण आणि उत्तर कोरियामधील वाद ठराविक काळाने उफाळून येत असतो, त्यात जोंग यांचा वाटा आहे.

– जोंग यांनी आपल्या देशाच्या संरक्षण मंत्र्यांना आरोपी म्हणून घोषित केले होते. त्याचबरोबर सरकारच्या विरोधात कट रचल्याच्या कारणामुळे त्यांनी स्वत:च्या काकांनाही देशद्रोही घोषित केले होते. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

– जोंग यांनी आपल्या भाषणातून तसेच इतर काही वक्तव्यांमधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांतील संबंध समोर आले आहेत.