News Flash

वाढदिवसानिमित्त मोदींनी मागितल्या ‘या’ पाच गोष्टी, पोस्ट केली Wish List

"अनेकांनी मला वाढदिवसानिमित्त काय हवं आहे असं विचारलं. त्यामुळेच मी..."

फाइल फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी ७० वा वाढदिवस साजरा केला. राजकारण, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातून जगभरातील वेगवेगळ्या दिग्गजांनी मोदींनी सोशल नेटवर्किंगवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ट्विटरवरही मोदींच्या वाढदिवसाची चांगलीच चर्चा होती. वाढदिवस संपल्यानंतर मध्यरात्री मोदींनी ट्विटरवरुन शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच गिफ्ट म्हणून आपल्याला काय हवे आहे हे ही सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री १२ वाजून ३८ मिनिटांनी ट्विटवरुन शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. “संपूर्ण भारतातून आणि जगभरातून अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत. मला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानतो. या शुभेच्छांमुळे मला माझ्या देशातील नागरिकांचे जीवन अधिक सुखकर आणि उत्तम बनवण्यासाठी सेवा करण्याची आणि काम करण्याची शक्ती मिळते,” असं मोदी म्हणाले आहेत.

दुसऱ्या ट्विटमध्ये मोदींनी वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट हवे आहे हे सांगितलं आहे. “अनेकांनी मला वाढदिवसानिमित्त काय हवं आहे असं विचारलं. त्यामुळेच मी तुम्हाला माझी विश लिस्ट सांगत आहे,” असं म्हणत पाच गोष्टींची यादीच दिली आहे. ती यादी पुढीलप्रमाणे…

> मास्क वापरा आणि योग्य पद्धतीने घाला

> सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करा. दोन फूट अंतर हे कायम लक्षात ठेवा

> गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

> रोगप्रतिकारशक्ती वाढवा

> आपल्या पृथ्वीला अधिक सशक्त बनवा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याबरोबरच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. देशातील नेत्यांबरोबरच मनोरंजन आणि क्रिडा सृष्टीतील दिग्गजांनाही मोदींना शुभेच्छा दिल्या. याचबरोबरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन, जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांच्यासहीत अन्य महत्वाच्या देशांच्या प्रमुखांनाही शुभेच्छा दिल्या. भारत आणि आपल्या देशामधील संबंध सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचेही सर्व नेत्यांनी कौतुक केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 8:54 am

Web Title: here is what i seek right now pm modi posted a wish list while thanking people for birthday wishes scsg 91
Next Stories
1 राष्ट्रपतींनी स्वीकारला हरसिमरत कौर यांचा राजीनामा; ‘यांच्याकडे’ असेल अतिरिक्त कार्यभार
2 भारतात कधीपर्यंत उपलब्ध होणार रशियन करोना लस?; RDIF चे सीईओ म्हणाले…
3 युगांडा : २१९ कैदी अर्धनग्नावस्थेत तुरुंगातून पसार, AK-47 बंदुकीही चोरल्या
Just Now!
X