News Flash

सीमेवर ५५ कोटींचे हेरॉईन जप्त

भारत- पाकिस्तान सीमेवरील फिरोजपूर व अमृतसर क्षेत्रात सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ११ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ५५ कोटी रुपये आहे.

भारत- पाकिस्तान सीमेवरील फिरोजपूर व अमृतसर क्षेत्रात सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ११ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ५५ कोटी रुपये आहे. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला असून पुल मोरान या छावणीनजीक च्या शेतात हेरॉइनची नऊ पाकिटे सापडली. हे ठिकाण अट्टारी सीमेवर आहे. पाकिस्तानने राजताल खेडय़ात हेरॉइन पाठवले होते त्यात एक मोबाईल, पाकिस्तानी सिमकार्ड जप्त करण्यात आले, असे सीमा सुरक्षा दलाचे उपमहासंचालक आर.एस.कटारिया यांनी सांगितले.
फिरोजपूर भागात डी.टी.माल छावणीलगत हेरॉईनची दोन पाकिटे व चार सिमकार्डे सापडली आहेत. एकूण ११ पाकिटे जप्त करण्यात आली त्यात एक किलो हेरॉईन होते. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ५५ कोटी रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 12:01 am

Web Title: heroin smuggling on border
टॅग : Smuggling
Next Stories
1 नक्षलग्रस्त कैमूर भागातील पंतप्रधानांच्या सभेला हिरवा कंदील
2 द्वेषाच्या वातावरणात भारत वाचू शकणार नाही- मुफ्ती सईद
3 अण्णा हजारे यांना धमकीचे पत्र
Just Now!
X