News Flash

जम्मू – लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला अटक

जम्मू व अनंतनाग पोलिसांच्या संयुक्त मोहीमेस यश

(प्रातिनिधिक छायाचित्र)

लष्कर-ए-मुस्तफा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात आज(शनिवार) यश आलं आहे. जम्मू व अनंतनाग पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहीमेत त्याला जम्मू येथून अटक केली गेली.  यावेळी त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड देखील हस्तगत करण्यात आलं आहे.

हिदायतुल्ला मलिकच्या अटकेमुळे दहशतवादी कारवायांशी निगडीत महत्वपूर्ण माहिती, भारतीय लष्कराच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याची त्याची योजना होती.

काश्मीर घाटीत सक्रीय असेलली लष्कर-ए-मुस्तफा ही जैश-ए-मोहम्मद या दहशवतावदी संघटनेचीच एक संघटना आहे. जम्मूचे एसएसपी श्रीधर पाटील यांनी याबाबत सांगितले की, जम्मूमधील कुंजवानी जवळ दहशवतवादी हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात आली. त्याच्यावर अटकेची कारवाई करतेवेळी त्याने पोलिसांवर हल्ला देखील केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2021 6:00 pm

Web Title: hidayatullah malik chief of lashkar e mustafa terror organisation has been arrested msr 87
Next Stories
1 कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारकडे आहे एवढा वेळ, राकेश टिकैत यांनी सांगितली तारीख
2 लडाख प्रश्नी चीन बरोबर लष्करी पातळीवरील चर्चाच हवी, जयशंकर यांनी सांगितलं त्यामागचं कारण…
3 राकेश टिकैत यांनी पोलिसांसमोर जोडले हात; म्हणाले…जय जवान, जय किसान!
Just Now!
X