21 January 2018

News Flash

परदेशी देणगी : दिल्ली हायकोर्टाची कॉंग्रेस आणि भाजपला नोटीस

परदेशातून देणगी गोळा केल्याच्या आरोपांसंदर्भात आपली बाजू तातडीने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडावी, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने भारतातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष

नवी दिल्ली | Updated: February 4, 2013 6:39 AM

परदेशातून देणगी गोळा केल्याच्या आरोपांसंदर्भात आपली बाजू तातडीने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडावी, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने भारतातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांना सोमवारी दिला.
कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ब्रिटनस्थित वेदांता ग्रुपशी संबंधित कंपन्यांकडून देणगी गोळा केली असून, त्याची केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा विशेष तपास गटाकडून चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर केंद्र सरकार या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजीव मेहरा यांनी न्यायालयाला दिली. केंद्र सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने केंद्र सरकारला तीन आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.

First Published on February 4, 2013 6:39 am

Web Title: high court notice to bjp and congress on pil to probe foreign funding
  1. No Comments.