20 January 2018

News Flash

माजी लष्करप्रमुखांच्या घरात हेरगिरी?

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या घरून दस्तावेजाची चोरी केल्याच्या आरोपावरून शनिवारी एका लष्करी अधिकाऱ्याला पकडण्यात आले. मेजर आर. विक्रम असे त्याचे नाव असून

विशेष प्रतिनिधी ,नवी दिल्ली | Updated: January 6, 2013 12:54 PM

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या घरून दस्तावेजाची चोरी केल्याच्या आरोपावरून शनिवारी एका लष्करी अधिकाऱ्याला पकडण्यात आले. मेजर आर. विक्रम असे त्याचे नाव असून तो लष्करी गणवेषात आणखी दोन सहकाऱ्यांसोबत जनरल सिंह यांच्या निवासस्थानी अनधिकृतपणे शिरल्याचे सांगण्यात आले. मात्र, हे प्रकरण गैरसमजातून घडल्याचे सांगून लष्कराने त्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे.
जनरल सिंह यांच्या निवासस्थानातून काही दस्तावेज काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या मेजर विक्रम याला सुरक्षारक्षक आणि सिंह यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळीच पकडले. सिंह यांच्या निवासस्थानी गेलेले लोक कोअर सिग्नल पथकाचे होते. ते फोन लावण्यासाठी आले होते, पण सिंह यांच्या घरी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याविषयी पूर्वसूचना देता आली नाही. त्यामुळे गैरसमजातून हे प्रकरण घडल्याचा दावा लष्कराच्या वतीने कर्नल दहिया यांनी केला. या गैरसमजाविषयी लष्कराने सिंह यांची माफी मागून हे प्रकरण संपविले आणि मेजर विक्रमला सोडण्यात आले. पण लष्कराचे अधिकारी हेरगिरीसाठी काही उपकरणे लावण्यासाठी आले होते, असा आरोप सिंह यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

First Published on January 6, 2013 12:54 pm

Web Title: high drama at ex army chief v k singhs house
  1. No Comments.