02 December 2020

News Flash

विमान अपहरणाचा कट; मुंबई, चेन्नईसह तीन विमानतळांवर हायअलर्ट

सर्व महत्वाच्या विमानतळांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

मुंबई, चेन्नई आणि हैदराबादवरून उड्डाण करणाऱ्या विमानांचे एकाचवेळी अपहरण करण्याच्या कटाची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हायअलर्ट जारी केला आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचे अपहरण करण्याच्या या कटात २३ लोकांचा एक गट सहभागी असल्याचे समजते. या कटाची माहिती मिळताच या तीन विमानतळांसह देशातील सर्व महत्वाच्या विमानतळांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

गुप्तचर यंत्रणांना अपहरणाचा कट समजताच विमानतळ सुरक्षा समन्वय समितीने शनिवारी तातडीची बैठक घेतली. एका महिलेने सुरक्षा अधिकाऱ्यांना या संबंधी इ मेल पाठवला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने सहा युवक मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळावरून एकाच वेळी विमानाचे अपहरण करण्याची योजना बनवत असल्याचे ऐकले होते. महिलेने दिलेल्या माहितीनुसार या कामात एकूण २३ लोक सहभागी होणार असून रविवारी हा कट अमलात आणला जाणार आहे.

विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) आहे. सीआयएसएफचे महासंचालक ओ.पी.सिंह यांनी या वृत्ताचा दुजोरा देत तिन्ही विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आल्याचे सांगितले. सुरक्षेबाबत अनेक महत्वपूर्ण पाऊले उचलण्यात आली आहेत. गस्त वाढवण्यात आली असून प्रवेशद्वारावरही सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी शहरातील पोलीस आणि इतर दलांशीही संपर्क साधला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 1:14 pm

Web Title: high jack threat mumbai hyderabad cheenai airport high alert
Next Stories
1 काश्मिरी जनतेला सैन्य आणि दहशतवादी दोघेही मारतात; दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य
2 काश्मीरमधील दंगेखोरांना पाकिस्तानकडून ‘कॅशलेस फंडिंग’
3 पेट्रोल १.३९ तर डिझेल १.०४ रूपयांनी महागले, आजपासून नवे दर लागू
Just Now!
X