News Flash

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात गेल्या चार महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ

२९ नोव्हेंबरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंद

संग्रहित (PTI)

देशात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांनी पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनचा पर्याय निवडण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे. यादरम्यान गेल्या २४ तासात देशात ४० हजार ९५३ नवे करोना रुग्ण सापडले असून गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय २३ हजार ६५३ जण उपचारानंतर बरे झाले असून १८८ मृत्यूंची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यासोबत आतापर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या १ कोटी १५ लाख ५५ हजार ३८४ इतकी झाली असून १ कोटी ११ लाख ७ हजार ३३२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात २ लाख ८८ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या १ लाख ५९ हजार ५५८ इतकी आहे. देशभरात आतापर्यंत ४ कोटी २० लाख ६३ हजार ३९२ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

भारतात सलग तिसऱ्या दिवशी ३० हजारांहून अधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या ३९ हजार ७२६ रुग्णांच्या तुलनेत शनिवारी चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात गेल्या आठवड्यापासून दिवसाला २० हजाराहून जास्त करोना रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार, देशाच्या एकूण आकडेवारीत महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड यांचा ८०.६३ टक्के वाटा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 10:45 am

Web Title: highest single day rise in nearly 4 months 40953 new covid cases in india sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अबब! तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संपत्ती पाच वर्षात १९८५ टक्क्यांनी वाढली
2 भारतातील पहिलं Sex Toy Store महिनाभरातच करावं लागलं बंद
3 भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ व्हावेत -ऑस्टिन
Just Now!
X