अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता डेमोक्रॅटच्या हिलरी क्लिंटन व रिपब्लिकनांचे डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. महामंगळवारच्या लढतींमध्ये ज्या प्राथमिक फे ऱ्या झाल्या, त्यात त्यांनी बाजी मारली. आता या दोघांमध्येच अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. बहुराज्यीय अशा या लढती होत्या. ट्रम्प यांनी मुस्लिमांना देशात येऊ देणार नाही, भारतीय लोकांना नोक ऱ्या हिसकावण्याची संधीच देणार नाही, अमेरिका-मेक्सिको यांच्यात भिंत बांधू अशी अनेक वादग्रस्त विधाने केली असली, तरी त्यांना अलाबामा, अरकासान्स, जॉर्जिया, मॅसॅच्युसेटस, टेनिसी, व्हेरमाँट व व्हर्जिनियात बाजी मारली. श्रीमती हिलरी क्लिंटन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय लढतीत अमेरिकेतील पहिली संभाव्य महिला अध्यक्ष म्हणून अलाबामा, अरकान्सास, जॉर्जिया, मॅसॅच्युसेटस, टेनिसी, टेक्सास, व्हर्जिनिया येथे बाजी मारली. आफ्रिकन-अमेकिरी मतदारांनी त्यांना मते दिली. २००८ मध्ये याच लोकांनी व्हर्जिनियात बराक ओबामा यांना विरोध केला होता पण आता त्या राज्यातही क्लिंटन यांनी बाजी मारली होती. क्लिंटन व ट्रम्प यांनी हे निर्विवाद विजय असल्याचा इन्कार केला आहे. राजकीय निरीक्षकांनी मात्र तो निर्विवाद विजय असल्याचे म्हटले होते. महामंगळवारी टेड क्रूझ यांना टेक्सासमध्ये विजय मिळाला. ओक्लाहोमा व अलास्काचा कौलही त्यांच्या बाजूने होता. मिनेसोटा येथे मार्को रुबियो यांनी पहिला विजय नोंदवला. डेमोक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांनी चार राज्यात विजय मिळवला. त्यात कोलोरॅडो, ओक्लाहोमा, मिनोसोटा व व्हेरमाँटचा समावेश होता. ट्रम्प हे अपेक्षेपेक्षा अटीतटीची लढत देऊ शकले. त्यांनी क्लिंटन यांचे आव्हान गांभीर्याने घेतले. उमेदवारी मिळाल्यानंतर हिलरी यांच्याविरोधात कडवी झुंज देईन असे सांगून ते म्हणाले, की मला ही लढत अवघड नाही.क्लिंटन यांनी सांगितले, की मी ट्रम्प यांच्या अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याच्या घोषणेला फारशी किंमत देत नाही. अमेरिकेला महान बनण्यापासून कुणी रोखलेले नाही, असेही त्या म्हणाल्या.