Himachal Pradesh Election 2017 Exit Poll : हिमाचल प्रदेशमध्ये मागील महिन्यात झालेल्या मतदानानंतरच्या एग्जिट पोल सर्व्हेमध्ये भाजपला आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. एनबीटी आणि सी वोटरच्या एग्जिट पोलनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला ६८ पैकी ४१ जागा मिळण्याची शक्यता आहे. इथे बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे. तर काँग्रेसला ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे. एग्जिट पोलनुसार, भाजपला ४७.६ टक्के तर काँग्रेसला ४४ टक्के मते मिळतील. त्यामुळे यंदा मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता कायम राखण्याचा दावा केला आहे. तर भाजपलाही एकहाती सत्ता मिळवण्याचा आत्मविश्वास आहे.

– इंडिया टुडे आणि AXIS MY INDIA च्या प्री पोल सर्व्हेत सर्वाधिक जागा भाजपला मिळतील. निवडणूक पूर्व सर्व्हेनुसार राज्यात भाजपला ४३-४७ जागांवर विजय मिळेल. तर काँग्रेसला २१ ते २५ तर इतरांना ०-२ जागा मिळू शकतात.

– एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीच्या निवडणूकपूर्व सर्व्हेत यावेळी भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. या सर्व्हेनुसार काँग्रेसला ६८ पैकी २२ ते २८ आणि भाजपला ३९ ते ४५ जागा मिळण्याची आशा आहे. तर सर्व्हेनुसार इतरांच्या खात्यात ० ते ३ जागा मिळतील.