News Flash

बस १०० फूट दरीत कोसळल्यानंतरही पाचवीतल्या मुलामुळे वाचले दहा विद्यार्थ्यांचे प्राण

स १०० फूट खोल दरीत कोसळल्यानंतरही एका विद्यार्थ्याने प्रसंग ओळखून हिम्मत दाखवल्यामुळे दहा मुलांचे प्राण वाचवता आले. ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यानंतर बस दरीत कोसळली.

हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील नुरपूर भागात सोमवारी संध्याकाळी स्कूल बसला भीषण अपघात झाला. बस १०० फूट खोल दरीत कोसळल्यानंतरही एका विद्यार्थ्याने प्रसंग ओळखून हिम्मत दाखवल्यामुळे दहा मुलांचे प्राण वाचवता आले. पाचव्या इयत्तेत शिकणारा रणबीरही या अपघातात जखमी झाला होता. पण रणबीरने स्वत:च्या दुखापती बाजूला ठेवल्या व दरीतून बाहेर पडल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांना अपघाताची माहिती दिली. त्यामुळे अन्य दहा मुलांना वाचवता आले.

ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यानंतर बस दरीत कोसळत असताना रणबीर बसबाहेर फेकला गेला. अपघातानंतर मी काहीवेळ बेशुद्ध होतो. जशी मला शुद्ध आली मी काठी आणि गवताच्या आधाराने रस्त्यावर आलो. त्यानंतर लगेचच लोकांना अपघाताची माहिती दिली असे रणबीरने सांगितले.

या अपघातात रणबीरच्या हाताला आणि डोक्याला मार लागला आहे. रणबीरचे वडिल शेतकरी असून तो गुरुचार गावात राहतो. या भीषण अपघातात २७ विद्यार्थ्यांसह एकूण २९ जणांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 2:01 pm

Web Title: himachal school bus accident
Next Stories
1 दाऊदचा फोन टॅप, दुबईत चालवतो रियल इस्टेटचा बिझनेस
2 दोन वर्षांपूर्वीच पोलिसांनी कारवाई केली असती तर मेहुल चोक्सी देशाबाहेर पळाला नसता
3 इंडिगो विमानात डासांचं साम्राज्य! तक्रार करणा-या डॉक्टरला धक्के मारुन विमानातून उतरवलं
Just Now!
X