News Flash

अमिताभना निमंत्रण दिल्याबद्दल लेखकाची नाराजी

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या वक्तव्याला त्यांनी आक्षेप घेतला

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना भोपाळमध्ये सुरू असलेल्या जागतिक हिंदी परिषदेला आमंत्रित केल्याबद्दल प्रख्यात हिंदी लेखक व पद्म पुरस्कार विजेते गिरिराज किशोर यांनी निषेध व्यक्त केला आहे.
अमिताभ यांचे वडील हरिवंशराय हे लेखक होते, मात्र अमिताभ यांना आमंत्रित करण्याचे कारण काय, असा सवाल किशोर यांनी विचारला आहे. भोपाळमध्ये वास्तव्य करणाऱ्या दोन पद्म पुरस्कार विजेत्यांना संयोजकांनी आमंत्रित करायला हवे होते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनेक साहित्य अकादमी विजेत्यांना आमंत्रित न केल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या वक्तव्याला त्यांनी आक्षेप घेतला. देशातून लेखक या परिषदेला येतील खाऊन, पिऊन व अभ्यास प्रबंध वाचून जातील, या त्यांच्या वक्तव्याबद्दल किशोर यांनी नाराजी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2015 5:10 am

Web Title: hindi literature function
Next Stories
1 डिजिटल जगावर हिंदी राज्य करेल-मोदी
2 आणखी दहा वर्षांनी कंपन्यांच्या ‘बोर्डरूम’ मध्ये यंत्रमानव
3 भाववाढीला आळा घालण्यासाठी कांद्याची अतिरिक्त आयात
Just Now!
X