सीएए, एनआरसीवरून देशात दोन गट पडल्याचं चित्र आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून भाजपाला विरोध केला जात आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यावर भूमिका मांडली असून, “हिंदू समाज म्हणजे भाजपा नाही. त्यामुळे भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नाही,” असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी मांडले आहे.
हिंदू समाज म्हणजे भाजपा नाही. आणि भाजपाला विरोध करणे म्हणजे हिंदू समाजाला विरोध करण्यासारखं नाही. राजकीय लढाई सुरुच राहणार असून यास हिंदूशी जोडू नका. असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उर्फ भय्याजी जोशी यांनी केलं आहे.
Suresh Bhaiyyaji Joshi, Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) general secretary in Goa: Hindu community does not mean Bharatiya Janata Party, and opposing BJP does not amount to opposing Hindus. Political fight will continue but it should not be linked to Hindus. pic.twitter.com/XBal0PM9zF
— ANI (@ANI) February 9, 2020
गोव्यामधील दोनापावला येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने ‘विश्वगुरू भारत-आरएसएसचा दृष्टीकोन’ या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
भय्याजी जोशी म्हणाले, भारतात काम करू इच्छिणाऱ्यांनी हिंदूसोबत त्यांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे. भारताला हिंदू समाजापासून वेगळ करून पाहता येणार नाही. हिंदू सदैव या देशाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज केवळ हिंदूमुळेच जिवंत आहे.
यावेळी त्यांनी हिंदूच्या सशक्तीकरणाची गरज अधोरेखित करत नवा संदेश दिल्याचे दिसून आले. भारतात कुणाला आयडिया ऑफ इंडियासाठी काम करायचं असेल तर दुसऱ्या अर्थाने त्याला हिंदूच्या सशक्तीकरणासाठीच काम करावं लागेल असंही जोशी यावेळी म्हणाले. तसेच, त्यांनी हिंदूच्या सशक्तीकरणाच्या आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले. मी हिंदूंच्या सशक्तीकरणाचा मुद्दा मांडला म्हणजे मी अन्य कोणत्या तरी समुदााच्या विरोधात आहे, असा अर्थ काढू नये. या देशात प्राधान्याने हिंदूसाठी काम व्हायला हवं इतकंच मला म्हणायचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2020 8:00 am