25 May 2020

News Flash

विकृती! महात्मा गांधींच्या पुतळयाला गोळी मारुन हिंदू महासभेने साजरी केली गांधी पुण्यतिथी

गांधी विचारांना विरोध करणाऱ्या अखिल भारत हिंदू महासभेने खूप विकृत पद्धतीने महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. नेहमीच गांधी विचारांना विरोध करणाऱ्या अखिल भारत हिंदू महासभेने खूप विकृत पद्धतीने महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली. हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा शकुन पांडे यांनी महात्मा गांधींच्या पुतळयाला गोळी मारुन पुण्यतिथी साजरी केली. आजच्याच दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती.

पूजा शकुन पांडे यांनी गोळी मारताच पुतळयामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडे यांनी महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महसभेशी जोडलेला होता.

अखिल भारत हिंदू महासभा नेहमीच गांधी पुण्यतिथी शौर्य दिवस म्हणून साजरा करते. पण आतापर्यंत गांधीजींच्या पुतळयाला गोळी मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली नव्हती. आज राष्ट्रपिता महात्मा गांधीची ७१ वी पुण्यतिथी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गांधीजींना श्रद्धांजली अपर्ण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2019 8:16 pm

Web Title: hindu mahasabha leader celebrates mahatma gandhis death by shooting his effigy
Next Stories
1 व्हिडिओकॉन प्रकरणात चंदा कोचर दोषी, बँकेच्या अंतर्गत चौकशीचा निष्कर्ष
2 २१ फेब्रुवारीपासून राम मंदिराचे निर्माणकार्य सुरु होणार, धर्मसंसदेची घोषणा
3 सुट्ट्या.. ते काय असतं?, सुट्टीच्या दिवशी कामाला जाऊन ‘त्यांनी’ कमावले १९ कोटी
Just Now!
X