News Flash

हिंदू महासभेने ग्वाल्हेरमध्ये सुरू केली गोडसे ज्ञानशाळा

नवा वाद उफळण्याची शक्यता

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे हिंदू महासभेकडून गोडसे ज्ञानशाळा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे युवकांपर्यंत नथुराम गोडसेचे विचार पोहचवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, रविवार(१० जानेवारी) ही शाळा सुरू करण्यात आली तेव्हा नथुराम गोडसेचा जयजयकार देखील हिंदू महासभेकडून करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी नथुराम गोडसेबरोबर अनेक महापुरूषांचे फोटो देखील ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर आता एक नवा वाद उफळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्वाल्हेरच्या दौलतगंज येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात गोडसे कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे.

“गोडसे ज्ञानशाळेचे उद् घाटन झालं आहे. आमच्या सोबत तरुणांसह अनेक महिला देखील आहेत. गुरु गोविंद सिंग, डॉ. हेडगेवार, वीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या सारख्या महापुरुषांपासून गोडसे यांनी प्रेरणा घेतली होती. आमचं असं म्हणण आहे की या देशाचे कुणीही विभाजन केलं तर हिंदू महासभा त्याला प्रखरपणे उत्तर देईल. हिंदू महासभेकडून पुन्हा एकदा नथुराम गोडस निर्माण करण्यात येईल. असं हिंदू महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भाद्वाज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

हे अभ्यास केंद्र युवा पिढीला भारताच्या फाळणीच्या पैलूंविषयी आणि विविध राष्ट्रीय नेत्यांविषयी ज्ञान प्रसारित करण्यासाठी माहिती देईल, असं देखील हिंदू महासभेकडून सांगण्यात आलं आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत नथुराम गोडेसेने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 12:03 pm

Web Title: hindu mahasabha opened a study centre in gwalior dedicated to nathuram godse msr 87
Next Stories
1 COVID Vaccine India : भारतीय लसींना जगभरातून मागणी, ९ देशांनी मागितली मदत; चीननेही कौतुक करताना म्हटलं…
2 बिहार : ते दोघं एकाच खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्यानंतर गावकऱ्यांनीच लावून दिलं लग्न
3 धक्कादायक! मुलगी झोपलेली असताना शेजारी भिंत ओलांडून घरात घुसला आणि…
Just Now!
X