News Flash

‘व्हॅलेंटाइन वीरां’ना हिंदू महासभेचा इशारा

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याचे बेत आखत असलेल्या प्रेमी युगुलांना धास्ती वाटेल, असा इरादा हिंदू महासभेने व्यक्त केला आहे. या दिवशी प्रेमाचे सार्वजनिकरीत्या प्रदर्शन करणाऱ्या जोडप्यांचे

| February 8, 2015 04:55 am

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याचे बेत आखत असलेल्या प्रेमी युगुलांना धास्ती वाटेल, असा इरादा हिंदू महासभेने व्यक्त केला आहे. या दिवशी प्रेमाचे सार्वजनिकरीत्या प्रदर्शन करणाऱ्या जोडप्यांचे लग्न लावून दिले जाईल, असे संघटनेने जाहीर केले आहे.

ही ‘पाश्चिमात्य परंपरा’ साजरी करण्यापासून युवकांना परावृत्त करण्यासाठी हिंदू महासभेने देशव्यापी कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेले युवकांचे चमू देशाच्या मोठय़ा शहरांमध्ये तरुण जोडपी जेथे नेहमी जातात असे मॉल्स, बागा, ऐतिहासिक स्मारके आणि इतर ठिकाणांना भेट देतील, असे संघटनेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2015 4:55 am

Web Title: hindu mahasabha to marry off young couples on valentines day
टॅग : Valentines Day
Next Stories
1 दिल्लीत ‘अब की बार’ केजरीवाल?
2 ‘हिंदू’ आता हिंदीत..
3 ‘आप’ला अपशकुन करण्यासाठी हाताची कमळाला साथ?
Just Now!
X