News Flash

पाकिस्तानमध्ये हिंदूविवाहांना मिळणार कायदेशीर मान्यता

पाकिस्तानमध्ये १.६ टक्के हिंदू राहतात, त्यांच्या विवाहपद्धतीला अद्याप कायदेशीर मान्यता नव्हती.

प्रतिनिधीक छायाचित्र

पाकिस्तानच्या निर्मितीपासून आतापर्यंत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हिंदू विवाहांना कायदेशीर मान्यता नव्हती. नववर्षाच्या सुरुवातीलाच सिनेटने हिंदू विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता मिळण्याच्या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता हिंदू पद्धतीने विवाह केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी करता येणार आहे. तसेच, घटस्फोट घेता येणे आणि  पतीच्या निधनानंतर महिलांना पुनर्विवाहाची परवानगी मिळाली आहे. हिंदू पद्धतीनुसार विवाह केलेल्या जोडप्यांना नोंदणीचे अधीकृत प्रमाणपत्र मिळणार आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास शिक्षा होऊ शकते अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे.

सोमवारी या कायद्याला वरिष्ठ सभागृहाची मंजुरी मिळाली आह. ज्या जोडप्यांचे घटस्फोट झाले आहेत त्यांना देखील लग्न करण्याची परवानगी मिळाली आहे. या कायद्याच्या १७ व्या कलमानुसार हिंदू विधवांना पुनर्विवाहाची मान्यता मिळाली आहे. पाकिस्तानातील खासदार रमेश कुमार वानकानी यांनी या घटनेचे स्वागत केले आहे. पाकिस्तानी हिंदू असण्याचा आज मला अभिमान वाटतो आहे असे ते म्हणाले. ही आम्हाला मिळालेली नववर्षाची सर्वात मोठी भेट आहे असे ते म्हणाले.

पाकिस्तानच्या संविधानाचे तज्ज्ञ ऐतजाज अहसान यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सप्टेंबरमध्ये हिंदू विवाह कायदा २०१६, चा मसुदा नॅशनल असेम्ब्लीमध्ये (लोकसभेच्या समकक्ष) ठेवण्यात आला होते. त्याला मान्यता मिळाल्यानंतर हे विधेयक वरिष्ठ सभागृहात म्हणजे सिनेटमध्ये आले.  सिनेटने याला मंजुरी दिल्यानंतर या कायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानमध्ये १.६ टक्के हिंदू राहतात. तरीदेखील त्यांच्या विवाहपद्धतीला कायदेशीर मान्यता मिळालेली नव्हती. ख्रिश्चन विवाहासाठी इंग्रजांनी तयार केलेला १८७० चा कायदा अस्तित्वात आहे. त्यानुसार त्यांच्या विवाहांना कायदेशीर मंजुरी होती पंरतु पाकिस्तानच्या निर्मितीपासून हिंदू विवाह कायदा अस्तित्वात नसल्यामुळे हिंदूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या जाचातून पाकिस्तानमधील हिंदूंची सुटका होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 4:56 pm

Web Title: hindu marriage act ramesh kumar senate approval pakistan
Next Stories
1 ग्रामीण भागाला ४०% नोटा पुरवा; आरबीआयचे बँकांना आदेश
2 पंतप्रधान मोदी हे इस्लामविरोधी, आयसिसचा दावा
3 प्रवासी यादी जाहीर झाल्यानंतर शिल्लक आसनांवर रेल्वेकडून १०% सवलत
Just Now!
X