07 August 2020

News Flash

VIDEO : हिंदू सेनेने साजरा केला डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस

जंतर मंतर परिसरात डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टर्ससोबत फुगेदेखील लावण्यात आले होते.

हिंदू सेनेने अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस साजरा केला. दिल्लीतील जंतर मंतर परिसरात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टर्ससोबत फुगेदेखील लावले होते. ट्रम्प यांच्या विजयासाठी हिंदू सेनेतर्फे गेल्या महिन्यात पूजेचे आयोजनदेखील करण्यात आले होते. १४ जून दुपारी १२ वाजता जंतर मंतर येथे डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपणास आमंत्रित करत आहोत, असा संदेश हिंदू सेनेतर्फे लावण्यात आलेल्या एका पोस्टरवर लिहिण्यात आला होता. आमच्याशी जोडले जा आणि मानवतेचे रक्षक अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस साजरा करा, असा संदेशदेखील लिहिण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना हिरो संबोधत गेल्या महिन्यात हिंदू सेनेद्वारे पूजा आणि हवनाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू सेनेने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी प्रार्थना करत त्यांना इस्लाम आणि दहशतवादापासून मानवतेचा बचाव करण्याचे आवाहन केले होते.

व्हिडिओ

donald-trump (Express Photo: Tashi Tobgyal)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2016 3:12 pm

Web Title: hindu sena celebrates donald trump birthday in delhi
टॅग Donald Trump
Next Stories
1 IIT JEE परीक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थ्याला कोचिंग क्लासकडून BMW बक्षिस
2 फक्त घोषणा देऊन भागणार नाही; मोदींचा खासदारांना कानमंत्र
3 अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ‘आयसिस’चा म्होरक्या बगदादी ठार
Just Now!
X