News Flash

एक पत्र ८३ हजार कोटींचं… हिंदुजा भावांमधील वादाला कारण ठरणाऱ्या ‘त्या’ पत्रात आहे तरी काय?

श्रीचंद हिंदुजा व मुलगी विनू यांनी ठोठावले न्यायालयाचे दरवाजे

अशोक हिंदुजा व श्रीचंद हिंदुजा (photo : Express Archive)

एका पत्रामुळे काही दिवसांपासून चार हिंदुजा भावांमध्ये मोठा वाद सुरू आहे. या पत्रानं हिंदुजा कुटुंबामध्ये ११.२ अरब डॉलर म्हणजेच जवळजवळ ८३ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून भांडण लावून दिलं आहे. साल २०१४ मधील या पत्रात असं म्हटलं आहे की, एका भावाकडे जी संपत्ती आहे, त्यावर सर्व भावांचा अधिकार आहे. त्यावर हे पत्र अवैध म्हणून घोषित करावं, या मागणीसाठी ८४ वर्षांचे श्रीचंद हिंदुजा व त्यांची मुलगी विनू यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

८३ हजार कोटींच्या संपत्तीची विभागणी करणाऱ्या या पत्रासंदर्भात लंडनमधील एका न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी (२३ जून) सुनावणी झाली. सुनावणी वेळी न्यायालयानं म्हणाले, “हिंदुजा बँकेवर श्रीचंद हिंदुजा यांचा पूर्ण अधिकार असताना गोपीचंद हिंदुजा, प्रकाश हिंदुजा व अशोक हिंदुजा या तीन भावांनी या पत्राचा उपयोग हिंदुजा बँकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला आहे. या पत्राचा कायदेशीररित्या कोणताही परिणाम होऊ नये, तसेच त्याचा वारसा पत्राप्रमाणे वापर केला जाऊ शकत नाही, अशी श्रीचंद हिंदुजा व त्यांची मुलगी विनू यांची भूमिका असून, तसा निर्णय न्यायालयानं द्यावा अशी त्यांची मागणी आहे,” असं न्यायालयानं सुनावणी वेळी नमूद केलं.

या वादावर तिन्ही भावांनी असं म्हटलं आहे की, “या खटल्याची यापुढे सुनावणी होऊ नये. ही सुनावणी होणं हिंदुजा परिवारांच्या सिद्धांताविरोधा जाईल. अनेक दशकांपासून हेच चालत आलं आहे की, सर्व संपत्ती सर्वांची आहे. कोणत्याही गोष्टीवर एकाची मालकी नाही. आपल्या कुटुंबाचं हे मूल्य वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

आता पुढे काय?

तिन्ही भावांनी न्यायालयात केलेला दावा मंजूर झाला, तर श्रीचंद हिंदुजा यांची सर्व संपत्ती त्यांची मुलगी विनू हिच्यासह कुटुंबातील इतरांकडे जाईल. यात हिंदुजा बँकेची मालकीचाही समावेश असेल. हिंदुजा कुटुंब जगातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. १०० वर्षांपासून हिंदुजा कुटुंबाचा व्यवसाय सुरू असून, फायनान्स, मीडिया, आरोग्य या क्षेत्रात ४० पेक्षा अधिक देशात हिंदुजा ग्रुपचा व्यवसाय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 2:15 pm

Web Title: hinduja brothers fight over letter dividing 11 billion fortune bmh 90
Next Stories
1 पतंजलीच्या करोनावरील औषधासंबंधी आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांचे महत्वाचे विधान
2 आता कूटनीती, भारत-चीन सीमावादावर महत्त्वाची बैठक
3 “मोदी सरकारनं करोना महामारी, पेट्रोल डिझेलचे दर अनलॉक केले”
Just Now!
X