ब्रिटनच्या २०१७ मधील श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा बंधू अग्रस्थानी असून त्यांची संपत्ती १६.२ अब्ज पौंड आहे. त्यांची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत २ अब्ज पौंडांनी वाढली आहे. सन्डे टाइम्सच्या वार्षिक श्रीमंत व्यक्ती यादीत असे म्हटले आहे की, ब्रेक्सिटमुळे देशाच्या अब्जाधीशांच्या संपत्तीवर परिणाम झालेला नाही उलट त्यांची संख्या वाढली असून आधीच्या अब्जाधीशांची संपत्ती १४ टक्क्य़ांनी वाढली आहे. जूनमध्ये ब्रेक्सिटचे सार्वमत घेण्यात आले होते तेव्हापासून उलट त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

श्रीचंद व गोपीचंद हिंदुजा हे ब्रिटनमधील १३४ अब्जाधीशांच्या यादीत अग्रस्थानी असून त्यांनी तेल, वायू, वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्य यात मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या ते लंडनचे ओल्ड वॉर ऑफिस पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रकल्पात गुंतले आहेत. भारतीय वंशाच्या अब्जाधीशात डेव्हीड व सिमॉन रूबेन यांचा समावेश असून ते गेल्या वर्षी अग्रस्थानी होते ते आता तिसऱ्या क्रमांकावर गेले असून पूर्वी तिसऱ्या क्रमांकावर असलेले लक्ष्मी मित्तल चौथ्या स्थानावर आहेत. आतापर्यंत यादीत हिंदुजा बंधूंचा दुसरा क्रमांक असे आता तो युक्रेनचे उद्योगपती लेन ब्लावाटनिक यांनी घेतला आहे. युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे ब्रिटनमधील श्रीमंतांवर परिणाम होईल अशी शंका होती ती खोटी ठरली आहे असे रॉबर्ट व्ॉटस यांनी सांगितले. ब्रिटनमधील १००० श्रीमंत व्यक्तींची संपत्ती ११० दशलक्ष डॉलर्स आहे. ही संपत्ती २०१६ मध्ये १०३ दशलक्ष पौंड होती तर आताच्या यादीत पहिल्या वीस जणांची संपत्ती १९१. ७७ अब्ज पौंड आहे. त्यांची संपत्ती बारा महिन्यात ३५.१८ अब्ज पौंडांनी वाढली आहे.