News Flash

हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती करू शकेल -मोहन भागवत

हिंदू समाजाने एकत्र येणे आणि एकसंध राहणे काळाची गरज आहे असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे

हिंदू कोणाचाही विरोध करण्यासाठी जगत नाहीत असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर समाज घडवायचा असेल तर हिंदू बांधवांनी एकत्र आले पाहिजे आणि एकसंध राहिले पाहिजे. हिंदू समाज एकत्र आला आणि तो एकसंध राहिला पाहिजे तरच या समाजाची प्रगती होईल असेही त्यांनी म्हटले आहे. हिंदू एकजुटीमुळे समाज बांधणीला नवी दिशा मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे. शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाली. याचनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विश्व हिंदू संमेलनात २५०० पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. या सगळ्यांसमोर बोलताना मोहन भागवत यांनी हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज बोलून दाखवली. हिंदू कधीही कोणाचा विरोध करायचा म्हणून जगत नाहीत. हे खरे आहे की काही लोक आहेत जे हिंदूंना विरोध करतात. असा विरोध होऊ नये म्हणून आपण स्वतः तयारी केली पाहिजे. एकसंध राहिलो तर आपल्या समाजाचे आपण कल्याण करू शकतो. सध्याच्या घडीला सर्वाधिक प्रतिभावान लोक हिंदू समाजातच आहेत असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

हिंदू समाज एकत्र येत नाही, त्यांचे एकत्र न येणे ही एक समस्या आहे. हजारो वर्षांपासून हिंदू समाजावर अन्याय होतो आहे कारण हिंदू समाज आपले मूळ सिद्धांत विसरला. आपल्याला एकत्र येणे आणि एकसंध राहणे ही काळाची गरज आहे. हिंदू समाज एकसंध झाला तरच हिंदूंची प्रगती होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात मोहन भागवत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 4:57 am

Web Title: hindus unite and work to establish a better society says mohan bhagwat
Next Stories
1 Me Too Urban Naxal ची पाटी गळ्यात अडकवल्याने गिरीश कर्नाड यांच्याविरोधात तक्रार
2 ‘२ कोटी नोकऱ्या देऊ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन हवेत विरले का?’
3 अत्याचार प्रतिबंधक कायद्याला ‘चॉकलेट’ची उपमा!
Just Now!
X