मोदी सरकारच्या कॅबिनेटमधील मंत्री व लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर पक्षांची सर्व सूत्र त्यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्याकडे आली आहेत. शिवाय, सध्या सुरू असलेल्या बिहारच्या निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टी स्वबळावर लढत आहे. दरम्यान, आता हिंदुस्थान अवाम मोर्चाने पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून रामविलास पासवान यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, चिराग पासवान यांच्याबद्दल अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलेले आहेत.

हिंदुस्थान अवाम मोर्चाकडून पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, ”देशाचे मोठे दलित नेते व आपल्या मंत्रिमंडळाचे सदस्य असलेले रामविलास पासवान यांचे मागील काही दिवासांअगोदर निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशातील नागरिकांना दुःख झालेले आहे. आज देखील आमच्या सारखे त्यांचे समर्थ त्यांची आठवणीने दुःखी होत आहोत. मात्र, संपूर्ण देशाच्या दुःखापासून वेगळे लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान त्यांच्या अत्यंसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी एका शुटींगमध्ये केवळ हसतखेळतच दिसले नाहीतर, कट-टू-कट शुटींगच्या गप्पा देखील मारत होते. ज्यामुळे रामविलास पासवान यांच्या समर्थक व नातलगांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.”

तसेच, ”रामविलास पासवान यांच्या निधानशी निगडीत असे अनेक प्रश्न आहेत. जे चिराग पासवान यांना कठड्यात उभे करत आहेत. एखादा केंद्रीय मंत्री रुग्णालयात दाखल झालेला असताना, अखेर कुणाच्या सांगण्यावरून रुग्णालय प्रशासनाने रामविलास पासवान यांचे मेडिकल बुलेटीन चालवले नाही? कुणाच्या सांगण्यावरून रुग्णालय प्रशासनाने उपचार घेत असलेल्या रामविलास पासवान यांना रुग्णालयात केवळ तीन जणांनाच भेटण्याची परवानगी दिली होती? याशिवाय अनेक असे प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर रामविलास पासवान यांच्या समर्थकांसह त्यांच्या नातलगांना जाणून घ्यायचे आहेत. ज्याची चौकशा आवश्यक आहे. तरी आपणास विनंती आहे की, वरील बाबींचा विचार करता रामविलास पासवान यांच्या निधनाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले जावेत. ज्यामुळे सत्य जनतेसमोर येईल.” असे देखील सांगण्यात आले आहे. या पत्रावर हिंदुस्थानी अवाम मोर्चा(सेक्युलर)चे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. दानिश रिजवान यांची स्वाक्षरी आहे.