News Flash

ममता बॅनर्जींना धक्काबुक्कीमागे काँग्रेसचा हात असण्याची शक्यता

* तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रतो मुखर्जींचे मत पश्चिमबंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अर्थमंत्री अमित मिश्रा यांना धक्काबुक्की

| April 12, 2013 10:45 am

* तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रतो मुखर्जींचे मत
पश्चिमबंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अर्थमंत्री अमित मिश्रा यांना धक्काबुक्कीमागे काँग्रेसचाही हात असल्याची शंका नाकारता येणार नसल्याचे तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रतो मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीतील नियोजन आयोगासमोर एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीवेळी सुब्रतो मुखर्जीही तेथे उपस्थित होते. ते म्हणाले की, ” ममता बॅनर्जी आणि अमित मिश्रा यांना एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीमागे काँग्रेसचाही हात आहे की नाही, याचीही चौकशी करणे गरजेचे आहे. परंतु, याबद्दलचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत.” तसेच “फक्त २० ते २२ एसएफआयच्या कार्यकर्त्यांना अडवणेही दिल्ली पोलिसांना कसे शक्य झाले नाही?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 10:45 am

Web Title: hints of congress hand behind attack on mamata banerjee
Next Stories
1 आता ‘ई-मेल’चा वारसदार नेमता येणार! गुगलचा नाविन्यपूर्ण शोध
2 यूपीए सरकार पाडण्यासाठी एक ज्येष्ठ नेता माझ्या संपर्कात होता: गडकरींचा गौप्यस्फोट
3 बेळगावात पोलिसी दंडेली
Just Now!
X