05 March 2021

News Flash

‘आप’मधील वाद संपुष्टात येण्याचे संकेत, ‘केजरीवाल टीम’ची यादव यांच्यासोबत बैठक

दिल्ली निवडणुकीत राक्षसी यश मिळालेल्या आम आदमी पक्षात सध्या सुरू असलेल्या अंतर्गत वादाला पूर्णविराम मिळण्याचे संकेत आहेत.

| March 17, 2015 04:49 am

दिल्ली निवडणुकीत राक्षसी यश मिळालेल्या आम आदमी पक्षात सध्या सुरू असलेल्या अंतर्गत वादाला पूर्णविराम मिळण्याचे संकेत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या चमूने योगेंद्र यादव यांची सोमवारी रात्री भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पक्षातील पदाधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आप’नेते संजय सिंह, कुमार विश्वास, आशुतोष आणि आशिष खेतान यांनी योगेंद्र यादव यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून बैठक तब्बल पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होती. योगेंद्र यादव यांच्यासोबत सकारात्मक चर्चेने सुरूवात झाली असून यापुढेही सकारात्मक दिशेनेच वाटचाल होईल असे ट्विट या बैठकीनंतर संजय सिंह यांनी केले आहे. त्यानंतर पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनीही सकारात्मक आशयाचे ट्विट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 4:49 am

Web Title: hints of truce in aap as kejriwal camp holds late night meeting with yogendra yadav
Next Stories
1 हेरगिरी कुणाच्या घरी जाऊन होत नाही!
2 कोणाच्या घरी जाऊन हेरगिरी केली जात नाही – जेटलींचे कॉंग्रेसला प्रत्युत्तर
3 १०० कोटींपेक्षा कमी खर्चाचे टोल बंद करण्याचा विचार – गडकरी
Just Now!
X