News Flash

Lockdown : स्थलांतरित कामगारांची घरी परतण्यासाठी १५० कि.मी.ची पदयात्रा

हाताला कामच नाही तर आम्ही खायचं काय? असा प्रश्नही या सगळ्यांनी विचारलाय

संग्रहित छायाचित्र

अवघा देश लॉकडाउन आहे. हातावरचं पोट असलेल्या कामागारांचे हाल सुरु झाले आहेत. अशात अहमदाबादमधल्या ५० स्थलांतरित कामगारांनी घरी परतण्यास सुरुवात केली आहे. ती देखील पायपीट करत. हे सगळे कामगार राजस्थानातील डुंगरपूर जिल्ह्यात असलेल्या एका गावातले रहिवासी आहेत. या सगळ्यांना त्यांचा प्रवास पायीच संपवावा लागणार आहे. अहमदाबाद ते डुंगरपूर हे १५० किमीचं अंतर त्यांना चालत पार करावं लागणार आहे.

देश लॉकडाउन असल्याने संपूर्ण देशात प्रवास करण्याचं एकही साधन उपलब्ध नाही. २१ दिवसांसाठी म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. ” आम्ही अहमदाबादमध्ये रोजंदारीवर काम करत होतो. मात्र आता इथेच थांबलो तर आमची उपासमार होईल. इथे थांबण्यात काहीही अर्थ नाही. हाताला काम नाही त्यामुळे खायला अन्न नाही अशी आमची अवस्था आहे.” असं म्हणत राधेश्याम पटेल नावाच्या एका कामगाराने त्याची व्यथा बोलून दाखवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 3:51 pm

Web Title: hit by lockdown stranded on roads 50 migrant labourers walk for days to reach home scj 81
Next Stories
1 सरकारनं योग्य दिशेनं पहिलं पाऊल टाकलं; राहुल गांधींनी केलं मोदी सरकारचं कौतुक
2 “…म्हणून भारतामध्ये करोनामुळे जास्त मृत्यू होणार नाहीत”; ICMR च्या माजी अध्यक्षांचा दावा
3 Lokcdown मुळे करोनावर प्रभावी ठरणारे ‘ते’ औषध बनवण्यात विलंब
Just Now!
X